मुंबई- जितेंद्र, संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जयप्रदा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'थानेदार' या म्युझिकल अॅक्शन ड्रामा चित्रपटाला आज ३० वर्षे झाली आहेत. हा प्रसंग आठवताना माधुरीने सोशल मीडियावर हीट डान्सबद्दल लिहिले आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली असून ती म्हणते, ''अॅक्शन, ड्राम आणि भरपूर मसाला. थानेदारची ३० वर्षे. हा एक असा चित्रपट आहे ज्याने मला तम्मा तम्मा लोगे हे संस्मरणीय गीत दिले.''
'तम्मा तम्मा लोगे' गाण्याला संगीतकार बप्पी लाहिरी यांनी संगीत दिले होते, तर गीत इंदीवर यांचे होते. हे गाणे अनुराधा पौडवाल यांच्यासमवेत बप्पी दा यांनी गायले होते.
हेही वाचा -कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग सातपुड्यात होणार