मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा म्हणजे 'हम आपके हैं कौन'. सुरज बडजातिया यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला आज २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९४ मध्ये ५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटानं अनेक अॅवॉर्डही मिळवले.
'हम आपके हैं कौन' चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण
१९९४ मध्ये ५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. माधुरी दीक्षित, सलमान खान, मोहनिश बहल, रेणूका शहाणे, अनुपम खेर, रिमा लागू आणि अलोकनाथ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमानं अनेक नवे विक्रम रचले होते
माधुरी दीक्षित, सलमान खान, मोहनिश बहल, रेणूका शहाणे, अनुपम खेर, रिमा लागू आणि अलोकनाथ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमानं अनेक नवे विक्रम रचले होते. या चित्रपटात तब्बल १४ गाणी आहेत. यातील ११ गाण्यांना लता मंगशेकर यांनी आपला आवाज दिला आहे. हा चित्रपट ९० च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता.
आजही या सिनेमाची जादू काही कमी झालेली नाही. चित्रपटात माधुरीनं निशा नावाचं तर सलमानने प्रेम नावाचं पात्र साकारलं होतं. कॉमेडीसोबतच प्रेक्षकांच्या डोळ्यात न कळत पाणी आणणाऱ्या या चित्रपटातील गाणी २५ वर्षांनंतर आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत.