मुंबई- बॉलिवूड ब्लॉकबस्टर 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' (डीडीएलजे)चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने लंडनमधील लिसेस्टर चौकात डीडीएलजेचे प्रमुख कलाकार शाहरुख खान आणि काजोल यांचा कांस्य पुतळा बसवण्यात येणार आहे. बॉलिवूडचा हा पहिला चित्रपट आहे ज्याची मुर्ती लीसेस्टर स्क्वेयरमध्ये बसवली जाईल.
यूकेच्या हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने ही घोषणा केली आहे. शाहरुख खान आणि काजोल यांचा पुतळा या चौकाचे आकर्षण ठरेल यात काही शंका नाही.