मुंबई- बॉलिवूडचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपटाने आज (मंगळवार) २५ वर्षे पूर्ण केली आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. यात परमीत सेठी याने बॉलिवूड पदार्पण केले होते. त्याने कुलजीत ही भूमिका साकारली होती.
परमीतने या चित्रपटात जी भूमिका साकारली त्याचा अनुभव शेअर केला. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये त्याची आणि शाहरुखची जी फाईट होते. त्याबद्दल तो बोलला.
परमजीत म्हणाला, ''हा क्लायमॅक्स सीन खूपच गंभीर होता. स्क्रिप्टमध्ये सुरुवातीला आमच्यात भांडणाचा सीन नव्हता. शाहरुखनेच हा सीन करण्यासाठी आदित्य चोप्राला भाग पाडले. आदित्यला फाईटची गरज वाटत नव्हती. मात्र शाहरुखने अशा प्रकारचे दृष्य हवे असा आग्रह धरला होता.''
तो पुढे म्हणाला, "हा फाईट सीन करतानाचा माझा एक अनुभव आहे. हे खूप कंटाळवाणे आणि कठीण होते. मला त्यात अनेकदा पडणे भाग पडले, परंतु या चित्रीकरणाने माझ्या कोपरला आणि हातालाही दुखापत केली. हा सीन पार पडल्यामुळे मला आनंद झाला आणि लोकांना तो सीन आवडला."