महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

२०२० विचित्र होते, २०२१ साठी कोणताही संकल्प नाही - अमिताभ बच्चन - बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनी नव्या वर्षात कोणताही संकल्प केलेला नाही. गेले वर्ष विचित्र होते आणि आगामी वर्षही तसेच असू शकते. मात्र भूतकाळाच्या तुलनेत काही चांगल्या पध्दतीने १.१.२१ बद्दलच्या भावनेची झलक एक चांगली अनुभुती वाटते, असे त्यांनी म्हटलंय.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन

By

Published : Jan 1, 2021, 7:34 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे की नवीन वर्षासाठी आपण कोणतीही प्रतिज्ञा केली नाही. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, "२०२० या संपूर्ण वर्षानंतर लिहिताना खूप विचित्र वाटत आहे. कारण गेले वर्ष खूप विचित्र होते आणि योणारे वर्षही विचित्र असू शकते. परंतु हां, भूतकाळाच्या तुलनेत काही चांगल्या पध्दतीने १.१.२१ बद्दलच्या भावनेची झलक एक चांगली अनुभुती वाटते, जी सर्वांचे लक्ष आकर्षित करते आणि एक चांगले वर्ष असण्याचा संकेत देते.''

पुढे त्यांनी लिहिले की, "कोणताही संकल्प केलेला नाही, ज्या गोष्टी करण्याची गरज आहे, ते केले पाहिजे आणि चांगले केले पाहिजे. नित्यक्रमात कोणताही बदल होऊ नये, आत्ता हे बाह्य शक्तीद्वारे नियंत्रित होत आहे. आशावादी रहा, आनंद पसरवा आणि लोकांची काळजी घ्या. "

हेही वाचा- नवीन वर्षाकडून कोणतीही अपेक्षा नाही - मनोज बाजपेयी

७८ वर्षीय बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या चाहत्यांना आणि अनुयायांना नवीन वर्षासाठी शांतता, प्रेम आणि सौहार्दाचा संदेश दिला आहे.

हेही वाचा- दीपिकाने इन्स्टाग्राम, ट्विटरवरुन सर्व पोस्ट केल्या डिलीट, चाहत्यांमध्ये खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details