मुंबई- नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरीजची बरीच चर्चा झाली. 'सेक्रेड गेम्स'ला मिळालेल्या या प्रतिसादानंतर याच्या दुसऱ्या सीझनचीदेखील अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या दुसऱ्या भागाची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाचा आता यातील गणेश गायतोंडे म्हणजेच नवाजुद्दीन आणि सैफ अली खान म्हणजेच सरताजचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
'सेक्रेड गेम्स २'मधील गणेश गायतोंडे, सरताजचा फर्स्ट लूक प्रदर्शित - saif ali khan
पिछली बार क्या बोला था गणेश भाई को? औकात! असे कॅप्शन देत नवाजुद्दीन तर अगर सरताज को सिस्टीम बदला हैं, तो खेल तो खेलना ही पडेगा असं कॅप्शन देत सैफचा लूक शेअर केला आहे
नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. पिछली बार क्या बोला था गणेश भाई को? औकात! असे कॅप्शन देत नवाजुद्दीन तर अगर सरताज को सिस्टीम बदला हैं, तो खेल तो खेलना ही पडेगा असं कॅप्शन देत सैफचा लूक शेअर केला आहे. 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या भागात सैफ अली खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता. तसेच नवाजुद्दीनने गँगस्टर गायतोंडेची भूमिका साकारली होती.
ही वेबसीरीज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटावणी यांनी सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान दुसऱ्या पर्वामध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन आणि अभिनेता रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकार दिसणार आहेत.