महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भन्साळींचा 'देवदास' झाला १९ वर्षांचा, २० कोटींचा सेट असलेला पहिला सिनेमा - Sanjay Leela Bhansali's super hit 'Devdas'

संजय लीला भन्साळी यांच्या सुपरहिट 'देवदास' या चित्रपटाच्या रिलीजला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या काळातला हा सर्वाधिक बजेट असलेला व सर्वाधिक कमाई करणार चित्रपट होता. याबरोबरच अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी या चित्रपटाशी संबंधीत आहेत.

Sanjay Leela Bhansali's movie 'Devdas'
भन्साळींचा 'देवदास' झाला १९ वर्षांचा

By

Published : Jul 12, 2021, 8:10 PM IST

संजय लीला भन्साळी यांच्या सुपरहिट 'देवदास' या चित्रपटाच्या रिलीजला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. भन्साळीसोबतच हा चित्रपट शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या कारकिर्दीतील सर्वात उठावदार चित्रपट मानला जातो. या चित्रपटाचे प्रत्येक दृश्य परिपूर्ण करण्यासाठी संजय लीला भन्साळी यांनी परिश्रमांसह प्रचंड रक्कम गुंतविली होती. त्यावेळी देवदास हा हिंदी सिनेमाचा सर्वात महागडा चित्रपट ठरला होता.

या चित्रपटातील इमारती, वेगवेगळे लोकेशन्स आणि कलाकारांची वेषभूषा यासाठी अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता. या चित्रपटाचा सेट एखाद्या संग्रहालयासारखा बनला होता. या चित्रपटाशी संबंधीत चकित करायला लागणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. त्यावर आपण एक नजर टाकूयात..

त्या काळातला सर्वात महागडा चित्रपट

देवदास या चित्रपटाचे बजेट त्यापूर्वी रिलीज झालेल्या कोणत्याही चित्रपटापेक्षा जास्त होते. हा चित्रपट त्यावेळी हिंदी सिनेमाचा सर्वात महागडा चित्रपट होता. हा चित्रपट सुमारे ५० कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये बनला होता.

देवदास चित्रपटाची १९ वर्षे

चंद्रमुखीच्या कोठ्यासाठी १३ कोटींचा खर्च

चित्रपटाचा सेट पाहून कुणाचे डोळे दिपले असते. हा सेट बनवण्यासाठी ९ महिने कालावधी लागला होता. या सेटचे बजेट तब्बल २० कोटी इतके होते. यातली सर्वात मोठी रक्कम चंद्रमुखीच्या कोठ्यासाठी खर्च करण्यात आली होती. याचे बजेट १३ कोटी इतके होते.

देवदास चित्रपटाची १९ वर्षे

पारोचे घरदेखील काही स्वस्तातले नव्हते. स्टेंड काचेच्या मदतीने हे घर बनवले होते. शुटिंगच्या काळात पाऊस सुरू होता त्यामुळे वारंवार याचा रंग जात असे व पुन्हा रंग भरावा लागत होता. हा सेट बनवण्यासाठी १.२ लाख स्टेंड काचाचे तुकडे वापरण्यात आले होते. याची किंमत तब्बल ३ कोटी इतकी होती.

४२ जनरेटर्स आणि ७०० इलेक्ट्रीशियन्सनी केले काम

साधारण चित्रपटासाठी एक अथवा दोन जनरेटर वापरण्यात येतो. पण या चित्रपटातील एका प्रसंगासाठी तब्बल ४२ जनरेटर्स वापरण्यात आले होते. २५०० मोठे लाईट्सचा पावर यावेळी छाय दिग्दर्शक विनोद प्रधान यांनी केला होता. यासाठी ७०० इलेक्ट्रीशियन्सनी केले काम केले होते.

देवदास चित्रपटाची १९ वर्षे

माधुरीच्या ड्रेसची किंमत होती फक्त १५ लाख

या चित्रपटातील माधुरी दीक्षितचे सर्व ड्रेस आउटफिशन्स फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केले होते. त्यावेळी या भारी आणि लक्झरी पोशाखांची किंमत सुमारे 15 लाख रुपये होती. 'काहे छेड़ छेड़ मोहे' या गाण्यामध्ये माधुरीने जो घागरा परिधान केला होता तो ३० किलो वजनाचा होता. इतक्या वजनाचा ड्रेस घालून डान्स करणे कठिण जात असल्यामुळे नवीन ड्रेस बनवण्यात आला त्याचे वजन १६ किलो होते. यात माधुरीने आणखी एक १० किलो वजनाचा ड्रेस घातला होता. तो बनवण्यासाठी दोन महिने लागले होते.

फॅशन डिझायनर नीतू लुल्ला आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्यासाठी कोलकाता येथून खास साड्या विकत घेतल्या होत्या. या साड्या ९ वारी असत. ऐश्वर्याला ही साडी नेसून तयार होण्यासाठी किमान ३ तास लागत असत.

देवदास चित्रपटाची १९ वर्षे

चित्रपटाचे संगीत हक्क १२.५ कोटी रुपयांना विकले गेले

संगीतकार इस्माईल दरबार यांनी चित्रपटाच्या गाण्यांसाठी दोन वर्षांचा बराच काळ घेतला. प्रत्येक गाण्याचे रेकॉर्डिंग सुमारे 10 दिवसांत केले गेले, त्यानंतर ते 8-9 वेळा मिक्स केले गेले. यादरम्यान, इस्माईल दरबार आणि संजय लीला भन्साळी यांच्यात बरेच वादविवाद व वाद झाले,. संगीतामध्ये कोणतीही तडजोड करण्यास संगीताची जाण असलेले भन्साळी तयार नव्हते. चित्रपटाचे संगीत हक्क १२.५ कोटी रुपयांना विकले गेले होते.

देवदास चित्रपटाची १९ वर्षे

त्या काळातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

२००२ मध्ये देवदास या चित्रपटाचे तब्बल ४१ कोटींचा गल्ला जमवला होता. त्याकाळात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक या चित्रपटाने केला होता. कान चित्र महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियरही ठेवण्यात आला होता.

हेही वाचा - ''मराठा सिर्फ दो ही बात जानता है...मारना या मरना'': ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details