मुंबई- या तो ये दोस्ती गहरी हैं, या फिर ये फोटो थ्री डी हैं. सैफ अली खानचा हा डायलॉग आजही अनेकांच्या लक्षात असेल. फरहान अख्तरचं दिग्दर्शन असलेला दिल चाहता हैं चित्रपट २००१ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याच चित्रपटातील हा डायलॉग आहे. आज या चित्रपटाला १८ वर्ष पूर्ण झालेत.
'दिल चाहता हैं'ची १८ वर्ष, प्रीती झिंटानं शेअर केली पोस्ट
बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटानं एकेकाळी बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. या चित्रपटात आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना, प्रीती झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा केवळ प्रेक्षकांचाच नाही, तर प्रीतीचाही आवडता चित्रपट आहे.

तिने स्वतःच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत हे सांगितलं आहे. या सिनेमातील हिट ठरलेलं आणि आजही अनेकांच्या ओठी असलेलं जाने क्यो लोग प्यार करते हैं, हे गाणं प्रीतीनं शेअर केलं आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलं आहे, जाने क्यो ये फिल्म मेरी फेवरट फिल्मों की लिस्ट में हैं...चित्रपटाच्या सेटवरील खास अनुभवांसाठी, मस्तीसाठी आणि असा चित्रपट बनवण्यासाठी तिनं फरहान खानसोबत सर्व कलाकारांचे आभार मानले आहेत.