महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

असं प्रेम ज्याला नाही म्हणू शकत अलविदा, 'कभी अलविदा ना कहना'ची १३ वर्ष - डायलॉग

धर्मा प्रोडक्शनने या सिनेमातील सर्व प्रसिद्ध डायलॉगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, एक अशा प्रकारचं प्रेम ज्याला तुम्ही कधीच अलविदा म्हणू शकत नाही

'कभी अलविदा ना कहना'ची १३ वर्ष

By

Published : Aug 11, 2019, 4:58 PM IST

मुंबई- शाहरूख खान आणि राणी मुखर्जीची जोडी आतापर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या जोडीच्या बहुतेक चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. यातीलच एक असलेल्या 'कभी अलविदा ना कहना'' सिनेमाला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत.

यानिमित्ताने करण जोहरनं पोस्ट शेअर करत म्हटलं, खास चित्रपट...खास कलाकार आणि खूप साऱ्या आठवणी. तर धर्मा प्रोडक्शनने या सिनेमातील सर्व प्रसिद्ध डायलॉगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, एक अशा प्रकारचं प्रेम ज्याला तुम्ही कधीच अलविदा म्हणू शकत नाही...'कभी अलविदा ना कहना'ची १३ वर्ष.

'कभी अलविदा ना कहना'ची १३ वर्ष

या सिनेमात शाहरूख आणि राणीशिवाय अभिषेक बच्चन, प्रीती झिंटा आणि किरण खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. 'एक प्रेम..जे सगळी नाती तोडून टाकतं', अशी या चित्रपटाची टॅगलाईन होती. करण जोहरचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा ११ ऑगस्ट २००६ ला प्रदर्शित झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details