मुंबई- 'चक दे इंडिया' चित्रपटाच्या प्रदर्शनाला १२ वर्ष पूर्ण झाले आहेत. याच निमित्ताने चित्रपटातील कलाकार विद्या मालवाडे, चित्राशी रावत आणि सागरिका घाटगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या सेटवरील आठवणींना उजाळा दिला आहे.
'चक दे इंडिया'ची १२ वर्ष, कलाकारांनी शेअर केली पोस्ट - प्रशिक्षक
विद्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटातील फोटो शेअर करत लिहिलं आहे, या खास सिनेमाला १२ वर्ष पूर्ण, ज्याने आमचं आयुष्यचं बदलून टाकलं आणि मला आयुष्याभरासाठी खास मित्रांचा एक परिवार दिला.
विद्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटातील फोटो शेअर करत लिहिलं आहे, या खास सिनेमाला १२ वर्ष पूर्ण, ज्याने आमचं आयुष्यचं बदलून टाकलं आणि मला आयुष्याभरासाठी खास मित्रांचा एक परिवार दिला. तर अभिनेत्री चित्राशी रावतनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, आमच्या चित्रपटाला आणि आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी सर्वांचे आभार.
या सिनेमात अभिनेता शाहरूख खानही महत्त्वाच्या भूमिकेत होता. यात त्याने महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला.