कॅलिफोर्निया : झूमने मंगळवारी जाहीर केले की ते सुमारे 1,300 किंवा अंदाजे 15 टक्के कर्मचार्यांना काढून टाकणार आहेत. अशाप्रकारे नोकर कपात करणारी झूम ही अॅमेझॉन, गुगल, स्पॉटीफाय तसेच डेल नंतर नवीनतम तंत्रज्ञान कंपनी बनणार आहे.
1,300 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ : झूम ब्लॉगवरील कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात झूमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी सांगितले की, 'टाळेबंदीमुळे संस्थेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. आम्ही आमची टीम अंदाजे 15 टक्क्यांनी कमी करण्याचा कठोर पण आवश्यक निर्णय घेतला आहे'. ते म्हणाले की, आम्ही आमच्या सुमारे 1,300 मेहनती आणि प्रतिभावान सहकाऱ्यांना निरोप देणार आहोत'.
सीईओ स्वत: वेतन कपात करतील : ते पुढे म्हणाले की, ते स्वत: आणि कंपनीतील इतर वरिष्ठ अधिकारी वेतन कपात करणार आहेत. कर्मचार्यांना दिलेल्या संदेशात त्यांनी कबूल केले की कंपनी कोविड काळात वेगाने वाढली मात्र यात काही चूका झाल्या. झूमचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक या नात्याने या चुका आणि आज आम्ही करत असलेल्या कृतींसाठी मी जबाबदार आहे, आणि मला केवळ शब्दांतच नव्हे तर माझ्या स्वतःच्या कृतीतून ही जबाबदारी दाखवायची आहे, असे एरिक युआन यांनी लिहिले. ते पुढे म्हणाले की, 'येत्या आर्थिक वर्षात मी माझ्या पगारात 98 टक्क्यांनी कपात करत आहे. तसेच मी माझा FY23 चा कॉर्पोरेट बोनस मागे घेत आहे. माझ्या कार्यकारी नेतृत्व संघाचे सदस्य येत्या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या मूळ वेतनात 20 टक्क्यांनी कपात करतील तसेच ते त्यांचे FY23 कॉर्पोरेट बोनस देखील घेणार नाहीत'.