महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

News GPT Channel Launched : जगातील पहिले एआय चॅट जीपीटी चॅनेल झाले लाँच, जाणून घ्या कसे करते काम - न्यूज जीपीटीचे सीईओ अ‍ॅलन लेव्ही

मायक्रोसॉफ्टने आपल्या ओपन एआयच्या माध्यमातून चॅट जीपीटीचे नवीन चॅनल लाँच केले आहे. हे चॅनल निपक्षपातीपणे बातम्या देणार असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

News GPT Channel Launched
चॅट जीपीटी चॅनेल

By

Published : Mar 16, 2023, 3:23 PM IST

नवी दिल्ली :एआय चॅटबोटच्या चॅट जीपीटीने सध्या टेक जगतात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकजण धास्तावले आहेत आता तर चॅट जीपीटीने संपूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेले न्यूज जीपीटी नावाचे जगातील पहिले न्यूज चॅनेल आता सुरू केले आहे. त्यामुळे माध्यमातील प्रतिनिधींच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. बातम्यांच्या जगात हा गेम चेंजर ठरणार असल्याचे न्यूज जीपीटीचे सीईओ अ‍ॅलन लेव्ही यांनी स्पष्ट केले आहे

पक्षपाती बातम्यांमुळे वृत्तवाहिन्या बदनाम :गेल्या अनेक काळांपासून वृत्तवाहिन्या पक्षपात आणि व्यक्तिनिष्ठ वृत्तांकन करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे न्यूज जीपीटीच्या माध्यमातून आम्ही दर्शकांना कोणताही छुपा अजेंडा किंवा पक्षपातीपणाशिवाय तथ्ये आणि सत्य प्रदान करण्यास सक्षम आहोत असल्याचे अ‍ॅलन लेव्ही यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. न्यूज जीपीटीचे कोणतेही वार्ताहर नाही आणि कोणताही पक्षपात नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. न्यूज जीपीटी News GPT जगभरातील वाचकांना निःपक्षपाती आणि तथ्यावर आधारित बातम्या प्रदान करण्याचा दावा करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच News GPT newsGPT.ai वर मोफत उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

न्यूज जीपीटीवरील बातम्या प्रभावित होत नाहीत :न्यूज जीपीटीच्या माध्यमातून सुरू करण्यात येणारे चॅनेल हे कोणत्याही प्रकाराने बाधित होणार नाही. मशीन लर्निंग अल्गोरिदम आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया तंत्रज्ञानाद्वारे ते बातम्यांवर प्रक्रिया करणार आहे. त्यामुळे News GPT जगभरातील संबंधित बातम्यांचे स्रोत रिअल टाइममध्ये स्कॅन करण्यास सक्षम आहे. नंतर अचूक, अद्ययावत आणि निःपक्षपाती असलेल्या बातम्या तयार करण्यासाठी या डेटाचा वापर करणार असल्याची माहिती अॅलन लेव्ही यांनी दिली. News GPT चे AI अल्गोरिदम सोशल मीडिया, न्यूज वेबसाइट्स आणि सरकारी एजन्सीसह विस्तृत स्त्रोतांकडील डेटाचे विश्लेषण करण्यास सक्षम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हे चॅनेल प्रेक्षकांना राजकारण आणि अर्थशास्त्रापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयांवर ताज्या बातम्या आणि माहिती प्रदान करणार आहे. इतर न्यूज चॅनेलच्या विपरीत न्यूज जीपीटीवरील बातम्या जाहिरातदार, राजकीय संलग्नता किंवा वैयक्तिक मतांनी प्रभावित होत नसल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

आठवड्यातील २४ तास देणार बातम्या :चॅट जीपीटीच्या या वाहिनीवर आठवड्यातील चोविस तास बातम्या पुरवण्यात येणार आहेत. या बातम्या अचूक आणि विश्वासार्ह पुरवण्यावर कंपनीचे लक्ष असल्याचे अ‍ॅलन लेव्ही यांनी स्पष्ट केले. प्रत्येकजण निःपक्षपाती आणि तथ्यावर आधारित असलेल्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज जीपीटी या वाहिनीवर त्या पाहू शकत असल्याचेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या ओपनएआयने फोटो आणि मजकूर इनपूट स्वीकारणारे त्याचे नवीन मोठे मल्टीमॉडल मॉडेल GPT-4 घोषित केल्यानंतर ही ही बातमी आल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तवाहिनीने दिली आहे.

हेही वाचा - Meta Layoff : मेटा पुन्हा नोकर कपातीच्या तयारीत, दुसऱ्या फेरीत 10 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

ABOUT THE AUTHOR

...view details