हैदराबाद : 'जागतिक दृकश्राव्य वारसा दिवस' दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे ध्वनिमुद्रित आणि दृकश्राव्य दस्तऐवजांचे महत्त्व आणि त्यांचे जतन याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणे. या दिवसाचं आयोजन युनेस्कोनं केलं आहे.
या दिवसाचा इतिहास :युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनने 27 ऑक्टोबर 2005 रोजी चित्रपट, टीव्ही, रेडिओ, फोटो प्रिंट्स यांसारख्या दृकश्राव्य माध्यमांच्या वारशाचे संरक्षण करण्याच्या उद्देशानं 'जागतिक दृकश्राव्य वारसा दिन' 2023 साजरा करण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स येथे भारतातील पहिले राष्ट्रीय सांस्कृतिक दृकश्राव्य संग्रह तयार करण्यात आले आहे.
जागतिक दृकश्राव्य वारसा दिन साजरा करण्याचा उद्देश :प्रत्येक व्यक्तीला दृकश्राव्य आवाजाची जाणीव करून देणे हे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग म्हणून दृकश्राव्य दस्तऐवजांचे महत्त्व मान्य करणे हा फोकस आहे.
तुम्हीही यात योगदान देऊ शकता: जेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या ऐतिहासिक सहलीला जाता तेव्हा फोटो, व्हिडीओ आणि त्यासंबंधित महत्त्वाच्या माहितीच्या छोट्या क्लिप बनवून सोशल मीडियावर अपलोड करणे हे खूप महत्त्वाचे योगदान असेल. त्यामुळे न जाताही लोकांना त्या ठिकाणांची माहिती ऐकून आणि पाहून घेता येईल.
जागतिक दृकश्राव्य वारसा दिनाची थीम : जागतिक दृकश्राव्य वारसा दिनासाठी 27 ऑक्टोबर 2023 रोजी 'युवर विंडो टू द वर्ल्ड' ही थीम असणार आहे.
हा दिवस कसा साजरा केला जातो ? हा दिवस दृकश्राव्य संवर्धन व्यावसायिक आणि भावी पिढ्यांसाठी वारसा जतन करणाऱ्या संस्थांचा सन्मान करतो. अनेक प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात ज्यामध्ये या दिवसाचा प्रचार करण्यासाठी स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.
हेही वाचा :
- International Chefs Day 2023 : आज का साजरा केला जातो 'आंतरराष्ट्रीय शेफ दिवस', कोणी सुरू केला, जाणून घ्या...
- World Osteoporosis Day 2023 : 'जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस' 2023; जाणून घ्या त्याचं महत्त्व आणि इतिहास
- World Trauma Day 2023 : 'जागतिक आघात दिन' 2023; ट्रॉमामुळे उद्भवू शकतात अनेक मानसिक समस्या