महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Withdrawn Cash without ATM card : आता एटीएममधून कार्डशिवायही काढता येतील पैसे; जाणून घ्या प्रोसेस... - help of UPI money

Withdrawn Cash without ATM card : तुमच्या खिशात एटीएम कार्ड नसले तरीही काळजी करण्याची गरज नाही, कारण आता एटीएम कार्डशिवायही पैसे काढता येणार आहेत. तुम्हाला फक्त तुमचा स्मार्टफोन लागेल. पद्धत खूप सोपी आहे. जाणून घ्या...

Withdrawn Cash without ATM card
एटीएममधून कार्डशिवायही काढता येतील पैसे

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 2:03 PM IST

हैदराबाद :Withdrawn Cash without ATM card एटीएम मशीनमधून पैसे काढायचे असल्यास डेबिट कार्ड आवश्यक आहे. पण आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या युगात तुम्ही डेबिट कार्डशिवायही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता. यासाठी तुमच्याकडे फक्त तुमचा मोबाईल असावा. यासाठी तुम्हाला एटीएम कार्डची गरज नाही. ही बँकिंग सेवा अनेक दिवसांपासून सुरू आहे.

कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा : अनेक बँका आधीच आपल्या ग्राहकांना कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा देत होत्या, पण आता रिझर्व्ह बँकेने त्याची व्याप्ती आणखी वाढवली आहे. या सुविधेसाठी UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस वापरला जाईल. आरबीआयने बँकांना कार्ड न वापरता पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आज आपण कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याबद्दल जाणून घेऊ. डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये BHIM, Paytm, GPay, PhonePe इत्यादीसारखे कोणतेही UPI सक्षम अ‍ॅप असले पाहिजे. तुम्ही या अ‍ॅप्सद्वारेच पैसे काढू शकाल.

या स्टेप्स करा फॉलो: पैसे काढण्यासाठी प्रथम एटीएममध्ये जा आणि कार्डशिवाय पैसे काढण्याचा पर्याय निवडा. तुम्हाला UPI द्वारे ओळख प्रदान करण्याचा पर्याय दिसेल. यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये UPI अ‍ॅप उघडा आणि समोर दिसणारा QR कोड स्कॅन करा. तुमचे UPI द्वारे प्रमाणीकरण केले जाईल आणि त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकाल. पुढील प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असेल. तुम्हाला हवी असलेली रक्कम टाका आणि तुमचे पैसे काढा.

कोणते तंत्रज्ञान वापरले जाईल? : डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच एनपीसीआय, एटीएम नेटवर्क आणि बँकांना स्वतंत्र सूचना जारी करणार आहे. या सुविधेसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI वापरला जाईल. UPI द्वारे ग्राहकांची ओळख पटवली जाईल आणि असे व्यवहार ATM नेटवर्कद्वारे सेटल केले जातील. यामुळे बँकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

कार्डशिवाय पैसे काढण्याचे फायदे : कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा अतिशय फायदेशीर असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. कार्डशिवाय पैसे काढण्याच्या सुविधेमुळे कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग यांसारख्या फसवणुकीला आळा बसेल. याशिवाय तुम्हाला कार्ड तुमच्याजवळ ठेवण्याची गरज नाही. हे सर्व काम तुमचा स्मार्टफोन करेल.

हेही वाचा :

  1. X Poll Feature : मोफत X वापरकर्त्यांसाठी 'ही' सुविधाही होणार बंद;
  2. IPhone 15 launch date : IPhone 15ची लाँच तारीख झाली जाहीर; हे असतील अप्रतिम फीचर्स...
  3. NPCI Launched Hello UPI : आता आवाजाद्वारे होणारं यूपीआय ट्रान्झॅक्शन; म्हणा हॅलो यूपीआय, त्वरित केले जाईल पेमेंट

ABOUT THE AUTHOR

...view details