सॅन फ्रान्सिस्को : मेसेज गायब होण्याची तक्रार अनेक यूजर्स व्हॉट्सअॅपकडे करत आहेत. अनेकांना याबाबतचा फटका बसला आहे. मात्र आता व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर्स यूजर्सचे मेसेज गायब होण्यापासून वाचवणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या यूजर्सला मोठा दिलासा मिळणार आहे. मेटाने याबाबतची घोषणा केली आहे. हे नवीन फिचर्स व्हॉट्सअॅपच्या आयओएस आणि अँड्रॉईड या दोन्ही बीटावर यूजर्सचे मॅसेज गायब होण्यापासून वाचवणार आहे. डब्लूबीटी इन्फोच्या अहवालानुसार हे फिचर्स प्ले स्टोअरवरुन आणि टेस्ट फ्लाईट अॅपवरुन यूजर्सला डाऊनलोड करुन घेता येणार आहे.
असे वापरता येईल नवीन फिचर्स :प्ले स्टोअर्स वरुन हे फिचर्स डाऊनलोड केल्यानंतर व्हॉट्स अॅपच्या यूजर्सला ते वापरता येणार आहे. त्यानंतर चॅटमध्ये असलेले मेसेज बुकमार्क चिन्हाने चिन्हांकित केले जातात. हे मेसेज संबंधित विभागात देखील सूचीबद्ध केले जातात. याशिवाय संभाषणात सामील असलेले वापरकर्ते या वैशिष्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतील. वापरकर्ते अनकीप या पर्यायाचा वापर करून चॅटमधील मेसेज हटवू शकतात. काही वेळा ग्रूप अॅडमीन केवळ असेच लोक असू शकतात जे मेसेज गायब होण्यापासून रोखू शकतात. या अहवालात मेसेज गायब होण्यापासून रोखण्याची क्षमता सध्या काही बीटा परीक्षकांकडे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात ते अधिक यूजर्सपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षाही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.