हैदराबाद :भारतासह जगभरामध्ये व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया अॅपचा फार वापर करण्यात येतो. आजकाल व्हॉट्सअॅप या अॅपमध्ये अनेकदा आपल्याला नवीन नवीन फीचर्स बघायला मिळतात. व्हॉट्सअॅपमध्ये यापुर्वीही अनेकदा वेगवेगळे फीचर्स आणले गेले आहे. वापरकर्तांना व्हॉट्सअॅप आणखी सोप्या पद्धतीने कसे वापरता येईल याबद्दल मेटा कंपनी नेहमीच विचार करत असते. आता पुन्हा एकदा मेटा कंपनीने व्हॉट्सअॅपमध्ये नवीन फीचर्स आणले आहे.
बॉटम टॅब केलेले डिझाइन : व्हॉट्सअॅपने अँड्रॉइडवरील अॅपच्या इंटरफेसमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. या बदलामुळे अॅप वापरणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. वापरकर्ते एका हाताने अॅप वापरू शकतील. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या अँड्रॉइड अॅपच्या बीटा टेस्टर्ससाठी बॉटम टॅब केलेले डिझाइन सादर केले होते. बॉटम टॅब iOS आवृत्तीमध्ये आधीपासूनच सक्रिय आहे. आता हे अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी देखील स्थिर आवृत्तीमध्ये ऑफर केले जाईल.
असे करा अपडेट : व्हॉट्सअॅपने अलीकडेच अॅपच्या बीटा आवृत्तीमध्ये नवीन रंग आणि एक्सेंट्ससह पुन्हा डिझाइन केलेल्या इंटरफेसची चाचणी सुरू केली. हे iOS आणि Android दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. हे अपडेट Google Play Store वरून व्हॉट्सअॅप Android 2.23.20.76 अपडेट करून उपलब्ध होईल. त्यात एक नवीन बॉटम-टॅब इंटरफेस उपलब्ध असेल. डाव्या बाजूला कम्युनिटी आयकॉन असलेल्या छोट्या टॅबमध्ये चॅट, कॉल, स्टेटस टॅब मिळेल. व्हॉट्सअॅपवर बॉटम चॅट, अपडेट्स, कम्युनिटी आणि कॉल टॅब आहेत. यासोबतच असे आयकॉन देखील दिले जातील, जे आधी उपलब्ध नव्हते पण आता ते स्क्रीनच्या शीर्षस्थानी आहेत. या बदलामुळे एक चांगली गोष्ट म्हणजे नवीन नेव्हिगेशन प्रणालीसह अॅप एका हाताने वापरणे सोपे होईल.