महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

'DeepFake' म्हणजे नेमकं काय रे भाऊ? 'तो' व्हिडिओ ओळखायचा कसा? जाणून घ्या सर्वकाही - डीपफेक व्हिडिओ ओळखायचा कसा

Deepfake : सचिन तेंडुलकरच्या एका व्हायरल व्हिडिओनंतर देशात डीपफेक तंत्रज्ञानावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सचिननं सोशल मीडियावर पोस्ट टाकून हा व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचं सांगितलं. चला तर मग जाणून घेऊया हे 'डीपफेक तंत्रज्ञान' असतं तरी काय?

Deepfake
Deepfake

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 6:59 PM IST

मुंबई Deepfake : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका अ‍ॅपची जाहिरात करताना दिसतोय. मात्र, या व्हिडिओचं वास्तव काही वेगळंच आहे. खरं तर, या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन तेंडुलकर नाही. हा एक 'डीपफेक' व्हिडिओ आहे. जो पाहिल्यानंतर खुद्द सचिन तेंडुलकरही हैराण झाला. आता त्यानं या व्हिडिओची तक्रार करणार असल्याचं म्हटलंय.

डीपफेक म्हणजे काय? : 'डीपफेक' हे एक असं तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे कोणत्याही व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यानं बदलला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) चा वापर होतो. डीपफेक व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रथम एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो एकत्रित केले जातात. त्यानंतर हे व्हिडिओ आणि फोटो एआय आणि एमएल वापरून मॉडेल तयार करण्यासाठी वापरले जातात. हे मॉडेल दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या व्हिडिओ किंवा फोटोसह वापरले जाते. याच्या मदतीनं त्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यानं बदलला जाऊ शकतो.

डीपफेक व्हिडिओचा वापर कुठे होतो : डीपफेक व्हिडिओचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. जसं की चित्रपट किंवा टीव्ही शोमध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा बदलणं. तसेच एखाद्या नेत्याचा चेहरा दाखवून वादग्रस्त विधान करणं, एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची बदनामी करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. अलीकडेच, सोशल मीडियावर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडिओ समोर आला होता. ज्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलं होतं. आता सचिन तेंडुलकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामुळे सेलिब्रिटींमध्ये खळबळ उडाली आहे.

डीपफेक व्हिडिओ ओळखण्याच्या पद्धती : डीपफेक व्हिडिओ धोकादायक धोकादायक ठरू शकतात. एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खराब करण्यासाठी किंवा त्याची बदनामी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे डीपफेक व्हिडिओ ओळखणं महत्त्वाचं आहे. डीपफेक व्हिडिओ ओळखण्यासाठी अनेक पद्धती आहेत. या पद्धती तुम्हाला हे बनावट व्हिडिओ ओळखण्यात मदत करू शकतात.

डीपफेक व्हिडिओ कसा ओळखायचा : डीपफेक व्हिडिओंमध्ये चेहऱ्यावरील हावभाव नैसर्गिक वाटत नाहीत. उदाहरणार्थ, चेहऱ्याचे भाव अचानक बदलू शकतात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंना उबळ येऊ शकते. याव्यतिरिक्त, चेहऱ्यावरील हावभाव व्हिडिओच्या संदर्भाशी सुसंगत नसू शकतात. डीपफेक व्हिडिओंची गुणवत्ता अनेकदा खराब असते. व्हिडिओमध्ये अस्पष्टता, फ्लिकरिंग किंवा रंग असमानता असू शकते. याव्यतिरिक्त, व्हिडिओंमध्ये विचित्र दिसणारी दृश्यं असू शकतात, जसं की एखाद्या व्यक्तीचं तोंड विनाकारण हलणे.

डीपफेक व्हिडिओ ओळखण्यासाठी सॉफ्टवेअर : व्हिडिओ व्यवहार्य आहे की नाही याकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ, एखादा नेता वादग्रस्त विधान करत आहे किंवा कोणी गुन्हा करत आहे, तर हे शक्य आहे का? हे शक्य वाटत नसल्यास, तो डीपफेक असू शकतो. डीपफेक व्हिडिओ ओळखण्यासाठी काही सॉफ्टवेअरही आहेत. हे सॉफ्टवेअर चेहऱ्यावरील हावभाव, व्हिडिओची गुणवत्ता आणि व्हिडिओच्या संदर्भाचे विश्लेषण करून डीपफेक व्हिडिओ ओळखण्यात मदत करतात.

हे वाचलंत का :

  1. चक्क क्रिकेटच्या देवाचाही डीपफेक व्हिडिओ; सचिननं दिलं स्पष्टीकरण
  2. Misused Of Deepfake System : डीपफेक प्रणालीचा सर्वाधिक गैरवापर पॉर्न इंडस्ट्रीत
  3. 'डीपफेक'ला सामोरं जाण्यासाठी केंद्र सरकार आणणार नवे नियम - अश्विनी वैष्णव

ABOUT THE AUTHOR

...view details