वॉशिंग्टन :चंद्रावरहे पाणी लघुग्रह किंवा पृथ्वीवरून आले असावे, असे विश्लेषण सांगतात. त्याची वाहतूक सूर्याने केली असावी असा तर्क आहे. खरे तर, सूर्यप्रकाशात पाणी नाही. सूर्याकडून येणाऱ्या हवेतील हायड्रोजन (influence of the Sun) आयनमुळे चंद्रावर पाणी (Water on the Moon) तयार झाले असावे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. चीनच्या चांगई 5 अंतराळयानाने (Chinas Change 5 spacecraft) परत आणलेल्या नमुन्यांच्या अलीकडील विश्लेषणाने याचा पुरावा दिला आहे. शास्त्रज्ञांनी चंद्राच्या कणांमध्ये हायड्रोजन आणि ड्युटेरियमचे प्रमाण तपासले आहे. यावरून ते सौर वाऱ्यातून आल्याची पुष्टी झाली.
शास्त्रज्ञांचा दावा :त्या वाऱ्यांमधून हायड्रोजन आयन चंद्रावर पोहोचले असतील, असे संशोधकांनी सांगितले. हे स्पष्ट केले आहे की, जेव्हा ते चंद्राच्या खनिज ऑक्साईडला स्पर्श करतात तेव्हा त्या कणांनी सोडलेल्या ऑक्सिजनशी एक बंध तयार केला आहे. सिम्युलेशनच्या आधारे, असे विश्लेषण केले गेले की परिणामी पाणी तयार होईल. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, ते चंद्राच्या थंड प्रदेशात जमा झाले असावे.
यापूर्वी चंद्रयान 1 नेही दिले होते पाण्याचे पुरावे :देशाचे पहिले चंद्र अभियान, 'चांद्रयान-1'ने चंद्राची काही नवी छायाचित्रे पाठवली होती. चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवरील पृष्ठभाग गंजल्याचे या छायाचित्रांमधून दिसून आले आहे. चंद्राच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याची आपल्याला आधीपासून माहिती आहे. विशेष म्हणजे, पाणी आणि ऑक्सिजनशिवाय लोहाला गंज चढू शकत नाही. त्यामुळे ही छायाचित्रे म्हणजे चंद्रावर पाणी आणि ऑक्सिजनचे अंश असल्याचे संकेत असल्याचा दावा सिंह यांनी केला होता.
भारताचे स्वप्न अधुरे :'चांद्रयान -2' ला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. पण, त्याच्याशी संबंधातून समोर येणारी माहिती खूप महत्त्वाची आहे. भारताने 22 जुलै 2019 रोजी चंद्रावर आपले दुसरे ‘चंद्रयान-2’ पाठवले होते. मात्र, त्यामधील लँडर 'विक्रम' त्याच वर्षी 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात 'सॉफ्ट लँडिंग' करण्यात अपयशी ठरले. ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर उतरणारा देश बनण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
चंद्रयान ३ मोहीम २०२२ :चंद्रयान 2 ला यश नाही आले. मात्र, हार न मानत भारत चंद्रयान-3 मोहीम 2022 मध्ये तिसऱ्या तिमाहीत सुरू करणार आहे. चंद्रयान ३ मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोसाठी महत्त्वाची असून त्यात आंतरग्रहीय मोहिमांमध्ये भारताच्या कामगिरीस बळ मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे चंद्रयान-3 मोहिम प्रभावित झाली आहे. चंद्रयान-३ हे चंद्रयान-२ प्रमाणेच असेल, मात्र यात ऑर्बिटरचा समावेश नसणार.