San Francisco:अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सनची अंतराळ पर्यटन कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकने ( Virgin Galactic 2022 ) च्या पहिल्या फ्लाइटसाठी तिकीट विक्री सर्वसामान्यांसाठी खुली केली आहे. कंपनीने तिकिटांची किंमत प्रत्येकी $450,000 इतकी ठेवली आहे. यासाठी ग्राहकांनी $150,000 डिपॉझिट भरावे आणि नंतर उरलेले $300,000 भरावे. व्हर्जिन गॅलेक्टिककडे वेबसाइटवर अर्ज भरू शकतात. व्हर्जिन गॅलेक्टिकने गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याचे संस्थापक ब्रॅन्सन ( Richard Branson ) अवकाशात गेले होते.
कंपनीने युनिटी 23 नावाचे फॉलो-अप फ्लाइट उडविण्याची योजना आखली, असून यात इटालियन वायुसेनेचे तीन सदस्य होते. परंतु सप्टेंबरमध्ये व्हर्जिन गॅलेक्टिकने ( Virgin Galactic ) कंपनीच्या वाहनात उत्पादन दोष आढळून आल्यानंतर काही काळासाठी उड्डाण थांबवले. पुढच्या महिन्यात, कंपनीने 2022 च्या शेवटपर्यंत व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करणार नाहीत, असेही स्पष्ट केले. विमानासाठी संपूर्ण ( enhancement programme ) आयोजित केला जाईल, असे अहवालात म्हटले आहे. या वर्षीच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाणाच्या आधी, कंपनीने 1,000 तिकीट विक्री गाठण्याचे अंतर्गत उद्दिष्टही ठेवले आहे.
काही ग्राहकांनी केले आरक्षण
व्हर्जिन गॅलेक्टिककडे देखील अशा ग्राहकांनी अंतराळातील सहलींसाठी आरक्षण ठेवले आहे. कंपनीचे अंदाजे 600 ग्राहक आहेत ज्यांनी सुरुवातीच्या तिकीट फेरीदरम्यान $250,000 चे आरक्षण केले होते. त्यानंतर कंपनीने गेल्या ऑगस्टमध्ये पुन्हा तिकीट विक्री सुरू केली, ज्या लोकांनी कंपनीकडे तिकीट खरेदी केले. त्यांना प्रत्यक्षात जागा खरेदी करण्याची परवानगी दिली. ती तिकिटे देखील $450,000 ची होती. व्हर्जिन गॅलेक्टिकने सांगितले की त्यांनी त्यापैकी 100 विकल्या, असे अहवालात म्हटले आहे. अंतराळात जाण्यासाठी, ग्राहक व्हर्जिन गॅलेक्टिकच्या एका स्पेसप्लेनमध्ये उड्डाण करतील. व्हाईट नाइट टू विमानासोबत 49,000 फूट उंचीवर नेले जाते.
व्हाईट नाइट टू विमान
एकदा योग्य उंचीनंतर व्हाईट नाइट टू विमान सोडेल. जे जहाजावरील रॉकेट इंजिन प्रज्वलित करून अंतराळात जाण्यास मदत करेल. विमान पृथ्वीपासून ५० मैलांपेक्षा जास्त उंचीवर जात असताना, विमानावरील प्रवासी त्यांचे सीटबेल्ट काढू शकतात आणि काही मिनिटांसाठी केबिनमध्ये तरंगू शकतात. नंतर पृथ्वीवर परत येण्यासाठी, वैमानिक स्पेसप्लेनचे पंख हलवतात आणि धावपट्टीवर खाली सरकतात.
हेही वाचा -Invisible Black Hole : आकाशात अजून एक ब्लॅक होलचे अस्तित्व : संशोधकांचा दावा