हैदराबाद :आकाशमालेतील शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह या महिन्याच्या सुरुवातील २९ अंशांनी वेगळे झाले आहे. मात्र हे दोघेही १ मार्चला जवळ येत आहेत. त्यामुळे अंतराळ संशोधकांसह स्कायवॉचर्सलाही हा दोन ग्रहांच्या भेटीचा दुर्मीळ योग पाहण्यास भेटणार आहे. याबाबत स्पेस डॉट कॉम या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आकाश मालेतील शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह जवळ येत असले, तरी त्यात चंद्रही सहभागी होणार आहे. त्यामुळे अंतराळप्रेमींना या दुर्मीळ योगायोग पाहण्याची संधी मिळणार आहे.
रोज रात्री कमी होईल दोन ग्रहांमधील अंतर :आकाश मालेतील शुक्र आणि गुरू हे दोन महत्वाचे गर्ह मानले जातात. या दोन ग्रहांतील अंतर या महिन्याच्या सुरुवातीलाच जास्त झाले होते. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून वेगळ्या अंतरावर गेले होते. मात्र आता या दोन्ही ग्रहांतील अंतर रोज रात्री कमी कमी होत जाणार आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत दोन्ही ग्रहांमधील अंतर नऊ अंशापेक्षा थोडे अधिक होते. 27 फेब्रुवारी रोजी हे अंतर केवळ 2.3 अंशांपर्यंत कमी होणार असल्याची माहिती अंतराळ तज्ज्ञांनी दिली आहे.