महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Users Can Earn Money From Twitter : आता ट्विटरवर पैसे कमावण्याची संधी, एलन मस्कने सांगितली भन्नाट योजना - ब्लू टिक व्हेरिफिकेशन

ट्विटरच्या वापरकर्त्यांना आता लवकरच पैसे कमावण्याची संधी मिळणार असल्याचे ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी जाहीर केले. ट्विटरवर मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर सदस्यता वाढवण्यात येणार असल्याचेही ट्विटरने जाहीर केले. त्यामाध्यमातून ब्लू टिक व्हेरिफिकेशन केलेल्या वापरकर्त्यांसाठी ४ हजार शब्दापर्यंत ट्विट करता येईल. त्यामाध्यमातून वापरकर्ते आपल्या फॉलोअर्सकडून शुल्क आकारु शकतील असेही एलन मस्क यांनी जाहीर केले.

Users Can Earn Money From Twitter
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 21, 2023, 10:41 AM IST

सॅन फ्रांन्सिस्को :लवकरच वापरकर्ते ट्विटरवर पैसे कमावू शकणार असल्याची माहिती ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी सोमवारी दिली. ट्विटर लवकरच मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर सदस्यता वाढणार आहे. त्यामुळे वापरकर्ते त्यांच्या फॉलोअर्सकडून शुल्क आकारू शकतील. यासाठी एलन मस्क यांनी ब्लू टिक वापरकर्त्यांना ४ हजार शब्दापर्यंत ट्विट करण्यास परवानगी देणार आहे. त्यामाध्यमातून वापरकर्त्यांना आपली कोणतीही माहिती पोस्ट करता येईल. त्यावर त्यांच्या फॉलोअर्सकडून वापरकर्ते शुल्क आकारू शकतील, असेही मस्क यांनी यावेळी स्पष्ट केले. दिर्घ ट्विटचा चांगला उपयोग होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ट्विट वाचण्यासाठी नवी योजना की पे वॉल : ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी आता ट्विटरवर पैसे कमावण्याची संधी असल्याचे जाहीर केले असले, तरी त्यांच्या पोस्टवर अनेक वापरकर्ते विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. काही वापरकर्त्यांनी ट्विटर वाचवण्यासाठी ही नवी योजना आहे का असा सवाल एलन मस्कला विचारला आहे. तर दुसरीकडे हे ट्विटर हे पे वॉल आहे का असेही यावेळी एलन मस्क यांना विचारण्यात आले. तर काही वापरकर्त्यांनी छान कल्पना असल्याची मस्क यांना प्रोत्साहनही दिले. तर एका वापरकर्त्यांने आता लेखक त्यांच्या पुस्तकातील संपूर्ण प्रकरण ट्विटरवर प्रकाशित करू शकतो, अशी खोचक टीकाही काहींनी केली. त्यामुळे पहिले काही ट्विट विनामुल्य सोडा आणि त्यानंतर पैसे घ्या असेही काही वापरकर्त्यांनी यावेळी कमेंट केल्या आहेत. तर काहींनी आगामी वैशिष्टे वापरकर्त्यांसाठी मायक्रो ब्लॉगिंगवर पैसे कमवण्याची उत्तम संधी असेल असेही म्हटले आहे.

ट्विटर ब्लू टिकसाठी आकारणार ९०० रुपये :एलन मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिकसाठी पैसे आकारले जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर २० मार्चपासून हे शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती ट्विटरकडून देण्यात आली. त्यामुळे २० मार्चनंतर नॉन ट्विटर ब्लू वापरकर्त्यांना दोन घटक प्रमाणीकरण पद्धतीने मजकूर किवा संदेश वापरण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचेही ट्विटरने जाहीर केले आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ट्विटरने याबाबतची माहिती आपल्या वापरकर्त्यांना दिली होती. आता ट्विटर वेबवर ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी दरमहा ६५० रुपये शुल्क आकारणार आहे. तर मोबाईलवर असलेल्या अँड्राईड आणि आयओएस वापरकर्त्यांना मोबाईल डिवाईसवर ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर यूएसमधील वापरकर्ते ४ हजार शब्दांपर्यंत लाब ट्विट अपलोड करू शकतात असेही ट्विटरने जाहीर केले आहे.

ब्लू टिक व्हेरिफिकेशन वापरकर्त्यांना दिसणार कमी जाहिराती :ट्विटरने आपल्या वापरकर्त्यांसाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी शुल्क आकारण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांसाठी ट्विटर ९०० रुपये आकारणार आहे. तर वेबसाठी ६५० रुपये आकारण्यात येणार आहेत. मात्र जे वापरकर्ते ब्लू टिक व्हेरिफिकेशन करणार नाहीत त्यांना ट्विटरच्या जाहिरातींचा सामना करावा लागणार आहे. तर दुसरीकडे ज्या वापरकर्त्यांनी ब्लू टिक व्हेरिफिकेशन केले आहे, त्यांनाही ५० टक्के जाहिरातींचा सामना करावा लागणार आहे. ट्विटर ब्लू टिक वापरकर्त्यांना ५० टक्के जाहिराती त्यांच्या वॉलवर दाखवणार आहे.

हेही वाचा - Apple Watch Saves Life : अॅप्पल वॉचने वाचवला एकाचा जीव, घातक अंतर्गत रक्तस्त्रावाबाबत दिले नोटीफिकेशन

ABOUT THE AUTHOR

...view details