नवी दिल्ली : ट्विटरने लेखकांसाठी सबस्टॅक लिंक सुरू करुन ऑनलाइन प्रकाशन करण्याची संधी दिली होती. मात्र सबस्टॅक लिंक सुरक्षित नसल्याने ती लेखकांच्या पसंतीस उतरली नाही. सबस्टॅक लिंकला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ट्विटरने सबस्टॅक लिंकला रिप्लाय देणे, रिट्विट करण्यावर बंदी घातली आहे. सबस्टॅक लिंकमुळे ट्विटरचे हजारो वापरकर्ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे सबस्टॅकचे संस्थापक ख्रिस बेस्ट, हॅमिश मॅकेन्झी आणि जयराज सेठ यांनी सबस्टॅक लिंकवर बंदी घातल्याने आपण निराश असल्याचे स्पष्ट केले आहे.
एलन मस्क घेतात क्षुल्लक तक्रारींवर निर्णय :ट्विटरने घेतलेल्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. लेखकांसाठी ट्विटरने सुरू केलेल्या या सबस्टॅक लिंकमुळे ट्विटरचे वापरकर्ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. एलन मस्क यांनी सुरू केलेल्या या सबस्टॅक लिंकचा वापर काहीजण त्यांच्या वृत्तपत्राचा प्रचार करण्यासाठी करतात. मात्र एलन मस्क यांनी त्यांच्या आर्थिक हितसंबंध आणि क्षुल्लक तक्रांरीच्या आधारे निर्णय घेत असल्याची टीका जुड लेगम यांनी केली आहे. हे असेच सुरू राहिल्यास आपण ट्विटरवर वेळ घालवणे व्यर्थ असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.