नवी दिल्ली : ट्विटरने लेखकांसाठी सबस्टॅक ही सुविधा सुरू केली होती. मात्र त्यानंतर या ट्विटची लिंक शेअर करणे, त्याला रिप्लाय देणे आणि ट्विट करणे ट्विटरने बंद केले होते. त्यामुळे ट्विटरच्या या पद्धतीवर सबस्टॅकच्या संस्थापकांनी चांगलीच टीका केली होती. मात्र आता ट्विटरने 20 एप्रिलला सर्व ब्लू टिक मार्क हटवण्यापूर्वी शुक्रवारी 10 हजार शब्दांच्या ट्विटची सेवा सुरू केली. ही सेवा फक्त सशुल्क ब्लू सदस्यांसाठी ट्विट पोस्ट करण्यास अनुमती देत असल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ट्विटरचा सबस्टॅकसोबत लढा :ट्विटरने लेखकांसाठी लांब मजकूर असलेल्या सबस्टॅकची सुविधा ट्विटरवर सुरू केली होती. या सेवेतून लेखकांना चांगलीच कमाई करता येणार असल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र ट्विटरने नुकतीच ही सेवा ट्विटरवर वापरण्यास मनाई केली होती. सबस्टॅकची लिंक शेअर करणे, ट्विट करणे, ट्विटला रिप्लाय करण्यावर ट्विटरने बंदी घातली होती. त्यानंतर ट्विटरने ब्लू मार्क असलेल्या वापरकर्त्यांसाठी 4 हजार शब्दांच्या मर्यादेचे ट्विट करण्यास परवानगी दिली होती. मात्र आता ट्विटरने ब्लू मार्क वापरकर्त्यांसाठी 10 हजार शब्दाचे लांब मजकूर असलेले ट्विट पोस्ट करण्यास परवानगी दिल्याने एलन मस्क यांनी गुरुवारी जाहीर केले आहे.
आता ट्विटरवर करा कमाई :ट्विटरने जारी केलेल्या या नव्या सुविधेमुळे लेखकांना आपले लेख पोस्ट करता येणार आहेत. त्यांच्या या लेखासाठी त्यांना ट्विटरकडून पैसे मोजले जाणार आहेत. ही सुविधा सुरू करण्यासाठी एलन मस्क यांनी गुरुवारी ट्विटरच्या वापरकर्त्यांना आवाहन केले होते. ट्विटरच्या या नवीन सुविधेसाठी ट्विटर ब्लूला साईन अप करुन ही सुविधा मिळवता येते. ट्विटरवर उत्पन्न मिळवण्यासाठी एलन मस्कने अर्ज करण्याचे आवाहन वापरकर्त्यांना केले होते. त्यानुसार यातील सेटींग्जमध्ये Income वर टॅप करुन आपले खाते अद्ययावत करता येणार आहे. ही सुविधा आता ट्विटरवर वापरकर्त्यांसाठी सक्षम करण्यात आल्याचेही ट्विटरच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
काय आहेत ट्विटरच्या या नव्या सुविधा :ट्विटरने दिलेल्या या लांब मजकूर असलेल्या सुविधेत वापरकर्त्यांना दहा हजार शब्दांचे ट्विट करता येणार आहे. यात फोटो किंवा व्हिडिओही अपलोड करता येत असल्याचे ट्विटरच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सबस्टॅकसोबत ट्विटरचा लढा सुरू असताना एलन मस्क यांनी याबाबत पोस्ट केले. सबस्टॅकने ट्विटरवर टीका केली आहे, हे प्रकरण अत्यंत निराशाजनक असल्याचे सबस्टॅकच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सीईओ ख्रिस बेस्ट यांनी सबस्टॅक नोट्सवरील पोस्टसह मस्कला याबाबत उत्तर दिले आहे.
हेही वाचा - Truecaller App New Feature : ट्रू कॉलरने आयफोन वापरकर्त्यांसाठी आणले नवीन फिचर, जाणून घ्या काय आहेत फायदे