चेन्नई :कार उत्पादक टोयोटा किर्लोस्कर मोटरने (Toyota Kirloskar Motor) आपल्या युटिलिटी व्हेइकल हिलक्ससाठी (utility vehicle Hilux) पुन्हा बुकिंग सुरू केल्याचे एका निवेदनात स्पष्ट (Toyota Hilux booking on companys website) केले आहे. पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांमुळे, जानेवारी 2022 मध्ये भारतात लॉन्च केलेल्या मॉडेलचे बुकिंग पुढच्याच महिन्यात फेब्रुवारीमध्ये तात्पुरते थांबवण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना वाहन बुक करता आले नाही.
जाणून घ्या किंमत :कंपनीच्या म्हणण्यानुसार, हिलक्स युटिलिटी वाहनाच्या जगभरातील विक्रीने 20 दशलक्ष युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. एमटी स्टँडर्ड व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 33.99 लाख रुपये आहे. मध्यम प्रकार म्हणून, कंपनी 4x4 MT प्रकारात उपलब्ध करत आहे, या गाडीची एक्स-शोरूम किंमत 35.80 लाख रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरियंट 4x4 AT High ची एक्स-शोरूम किंमत 36.80 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
टोयोटा हिलक्सची वैशिष्ट्ये (Toyota Hilux Features) : टोयोटा हिलक्स स्टोरेजसह फ्रंट सेंटर स्लाइडिंग आर्मरेस्ट (front center sliding armrest), अप्पर कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील, 8-इंच स्मार्ट प्लेकास्ट टचस्क्रीन ऑडिओ, स्मार्टफोन आधारित नेव्हिगेशन आणि प्रीमियम लेदर सीट्स यासारख्या आधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
सुरक्षेची काळजी घेतली :टोयोटा हिलक्समध्येही सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. कंपनीने सर्व प्रकारांमध्ये हिलक्सला 7 सप्लिमेंटल रेस्ट्रेंट सिस्टम (Supplemental Restraint System) एअरबॅग्ज, वाहन स्थिरता नियंत्रण, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि ब्रेक असिस्ट यांसारखी तांत्रिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. पॉवर आणि इको ड्रायव्हिंग मोड्स आणि 4X4 सारखी सुरक्षा आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटरने रचला नवा विक्रम : टोयोटा किर्लोस्कर मोटार या वाहन उत्पादक कंपनीने 2022 मध्ये कंपनीच्या रेकॉर्ड लिस्टमध्ये नवीन रेकॉर्ड नोंदवला आहे. कंपनीने गेल्या 10 वर्षात 2022 मध्ये सर्वाधिक कार विकल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये कंपनीने एकूण 1,60,357 वाहने विकली. तर 2021 मध्ये 1,30,768 वाहन विक्रीसह 23 टक्के वाढ झाली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर किर्लोस्कर समूहाने त्यांची एकुलती एक मुलगी मानसी टाटा (Manasi Tata) यांच्याकडे कंपनीची धुरा सोपवली होती. मानसीचे लग्न रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा यांच्याशी झाले आहे.