महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Tick Infection Affects Brain Cell : टिक इन्फेक्शनचा मेंदूतील विविध पेशींवर होतो परिणाम, विषाणू मेंदूतील पेशींना करतो संक्रमीत - टिक इन्फेक्शनचा परिणाम

टिक बोर्न एन्सेफलायटीस विषाणू मेंदूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींना संक्रमीत करत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हे संशोधन उमे विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे.

Tick Infection Affects Brain Cell
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 18, 2023, 3:28 PM IST

वॉशिंग्टन : टिक-बोर्न एन्सेफलायटीस (TBE) विषाणू मेंदूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेंदूच्या पेशींना संक्रमीत करत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. प्रभावित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय झाली आहे की नाही यावर टिक इन्फेक्शनचा परिणाम अवलंबून असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. स्वीडनमधील उमे विद्यापीठाच्या संशोधनात याबाबतचा शोध लागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टीबीई विषाणू मेंदूमध्ये करतो संक्रमण :हा विषाणू मेंदूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कशी सक्रिय करतो, याची माहिती संशोधकांनी स्पष्ट केली आहे. या कठीण आजाराविरुद्ध प्रभावी उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांच्या विकासासाठी एक महत्त्वाची पायरी असल्याचेही उमिया विद्यापीठातील प्राध्यापक आणि या संशोधनाच्या संशोधक अ‍ॅना ओव्हरबी यांनी स्पष्ट केले आहे. या संशोधकांनी टीबीई TBE विषाणू मेंदूला एन्सेफलायटीस कसा संक्रमित करतो याचा अभ्यास केला आहे. त्यासाठी संशोधकांनी उंदरांच्या मेंदूतील विषाणूंचे स्थान त्रिमितीयपणे निर्धारित केले. त्यासह मेंदूच्या कोणत्या विशिष्ट भागांना TBE विषाणूचा संसर्ग झाला आहे हे निर्धारित करण्यासाठी एक पद्धत विकसित केली. ही पद्धत वेगवेगळ्या पेशी प्रकारांमधील जनुक अभिव्यक्तीच्या अभ्यासासह एकत्रित केलेल्या प्रतिमा विश्लेषणातील माहितीवर आधारित आहे. परिणाम मेंदूमध्ये विषाणूला रोड मॅप म्हणून पाहिले जाऊ शकत असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले.

रोगप्रतिकारक प्रणालीवर केवळ विषाणूचा होतो प्रसार :जन्मजात रोगप्रतिकारक प्रतिसादासह उंदरांच्या मेंदूमध्ये विषाणूचा प्रसार होण्यात मोठा फरक आहे. या विषाणूने उंदराच्या जन्मजात रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना संक्रमित केले. जेव्हा संशोधकांनी संक्रमित मेंदूच्या भागातील पेशींवर झूम इन केले, तेव्हा रोगप्रतिकारक प्रणालीवर केवळ विषाणूचा प्रसार कसा होतो याबाबतची माहिती मिळाली. त्यासह फक्त रोगप्रतिकारक प्रणालीवरच परिणाम होत नाही, तर मेंदूच्या प्रभावित भागात कोणत्या पेशींचे प्रकार संक्रमित झाले हे देखील बदलल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

मज्जातंतू पेशीना झाला संसर्ग :जेव्हा संशोधकांनी आणखी झूम करुन पाहिले असता, मेंदूतील रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होऊ शकत नसलेल्या मेंदूच्या रोगप्रतिकारक पेशी, मायक्रोग्लियाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. उंदिरांची रोगप्रतिकारक शक्ती मेंदूमध्ये सक्रिय होऊ शकते. मात्र त्यांच्या मज्जातंतू पेशीना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. जन्मजात रोगप्रतिकारक प्रणाली TBE विषाणू मेंदूला नुकसान होण्यापासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु ते कोठे आणि कोणत्या पेशी संक्रमित करतात हे अस्पष्ट असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. TBE विषाणूंची लागण झालेल्यां रुग्णांसाठी रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व अधोरेखित करतात. आम्ही विकसित केलेल्या नवीन इमेजिंग पद्धतींसह मेंदूला संक्रमित करणार्‍या विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी हे महत्वाचे असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. टीबीई ही केवळ स्वीडनमधीलच नाही, तर स्टॉकहोम द्वीपसमूह, मध्य आणि पूर्व युरोपमधील ही एक मोठी समस्या आहे. या व्हायरसमुळे दीर्घकालीन अपंगत्वासह मेंदूला गंभीर जळजळ होऊ शकते. टीबीईसाठी सध्या कोणतेही उपचार नसल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - AI Based Smartphone App : एआय स्मार्टफोन अ‍ॅप तुम्हाला धूम्रपान सोडण्यास करू शकते मदत, जाणून घ्या कसे करते काम

ABOUT THE AUTHOR

...view details