लंडन : धूम्रपान एकदा जडल्यानंतर ते सोडणे महाकठिण काम होते. मात्र धूम्रपान सोडण्यासाठी ब्रिटीश संशोधकांनी धूम्रपान थांबवण्याचे मोबाइल अॅप विकसित केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियाच्या संशोधनाने क्विट सेन्स हे अॅप विकसित केले आहे. हे जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) स्टॉप स्मोकिंग अॅप आहे. नागरिक धुम्रपानाच्या ठिकाणी कधी प्रवेश करतात, याबाबत हे अॅप ओळखते. त्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांच्या विशिष्ट धूम्रपान ट्रिगर्सचे व्यवस्थापन करण्यात मदत करते. हे अॅप धूम्रपान सोडण्यास मदत करेल, असा विश्वास या संशोधकांना आहे.
क्विट सेन्स अॅप कसे करते कार्य :अनेक वेळा नागरिकांचे धूम्रपान सोडण्याचे प्रयत्न अयशस्वी होतात. त्यामुळे धूम्रपानाच्या ठिकाणी वेळ घालवल्यामुळे धूम्रपान करण्याचा आग्रह केला जातो. मात्र धुम्रपान करणाऱ्यांना अशा प्रकारच्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यात हे अॅप मदत करते. असे यूएईच्या स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस संशोधक प्राध्यापक फेलिक्स नॉटन यांनी स्पष्ट केले. क्विट सेन्स हे एक AI स्मार्टफोन अॅप आहे. ते वापरकर्त्यांना रिअल टाइममध्ये धूम्रपान करण्याची इच्छा व्यवस्थापित करण्यात मदत करते. याबाबत केव्हा आणि कोणते संदेश प्रदर्शित करायचे हे ठरवण्यासाठी पूर्वीच्या धूम्रपानाच्या घटनांच्या वेळा, स्थाने आणि ट्रिगर्सबद्दल शिकवले जाते, असेही केंब्रिज विद्यापीठातील क्लो सिगेल ब्राऊन यांनी सांगितले आहे.