सोल : एलजी डिस्प्लेने जाहीर केले आहे ( LG Develops Invisible Sound Technology for Car ) की, त्यांनी 'थिन अॅक्ट्युएटर साउंड सोल्युशन' विकसित ( Thin Actuator Sound Solution ) केले आहे. जे लवकरच बाजारात आणण्याची ( Thin Actuator Sound Solution for Automobiles ) त्यांची योजना आहे. ऑटोमोबाईल्ससाठी हे एक नवीन ध्वनी तंत्रज्ञान ( New Sound Technology For Automobiles ) आहे. हे पारंपारिक स्पीकरपासून वेगळे असेल आणि बाहेरून दिसणार नाही.
व्हॉइस कॉइल, शंकू आणि चुंबक यांसारख्या घटकांमुळे स्पीकर सामान्यतः मोठे आणि जड असतात. एलजी डिस्प्लेचे फिल्म-टाइप एक्सायटर तंत्रज्ञान 'थिन अॅक्ट्युएटर साउंड सोल्युशन' अत्यंत स्लिम आणि हलके बनवते. ज्यामुळे ते कारसाठी जवळजवळ अदृश्य स्पीकर बनते. नवीन स्पीकरची जाडी 2.5 मिमी असेल. ते पासपोर्ट आकारात (150 मिमी x 90 मिमी) येईल. ते खूप हलके आहे. त्याचे वजन दोन नाण्यांच्या बरोबरीने फक्त 40 ग्रॅम आहे. याबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.