महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

लॅपटॉपपेक्षा टॅबलेट होणार ग्राहकांमध्ये लोकप्रिय : गुगलचा दावा - technology updates

कोरोनामुळे अँड्रॉइड टॅब्लेट मार्केटमध्ये पुन्हा वाढ होत आहे आणि लवकरच लॅपटॉपपेक्षा ते अधिक लोकप्रिय होईल, असा दावा गुगलच्या टॅब्लेटचे CTO तसेच Android सह-संस्थापक रिच मायनर यांनी केला आहे.

Tablets
Tablets

By

Published : Mar 11, 2022, 7:18 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : कोरोनामुळे अँड्रॉइड टॅब्लेट मार्केटमध्ये पुन्हा वाढ होत आहे आणि लवकरच लॅपटॉपपेक्षा ते अधिक लोकप्रिय होईल, असा दावा गुगलच्या टॅब्लेटचे CTO तसेच Android सह-संस्थापक रिच मायनर यांनी केला आहे. भविष्यात एक "क्रॉसओव्हर पॉइंट" येईल तेव्हा, टॅब्लेट लॅपटॉपच्या विक्रीला मागे टाकतील. मायनरने या आठवड्याच्या सुरुवातीला 'द अँड्रॉइड शो' मध्ये ह ेविधान केले.

मला वाटतं इथे अॅप्स टॅब्लेटचा विचार करत असतील. मार्केटच्या वाढीचे आणखी एक कारण म्हणून टॅब्लेट "लॅपटॉपपेक्षा खूप उत्पादक आणि कमी खर्चिक" बनले आहेत. टॅबलेट खूप चांगल्या बनू लागल्या आणि त्या अधिक गोष्टींसाठी वापरल्या जात आहेत." मायनर म्हणाले.कंपनीने नुकतीच Android 12L ची घोषणा केली. जी Android 12 ची आवृत्ती टॅब्लेट, फोल्डेबल आणि ChromeOS डिव्हाइसेससाठी खास डिझाईन केली आहे. Android 12L व्यतिरिक्त, Google ने विकसकांसाठी OS आणि Play मधील नवीन वैशिष्ट्ये देखील यात जोडली आहेत. यात मोठ्या-स्क्रीन उपकरणांसाठी त्याच्या मटेरियल डिझाइन मार्गदर्शनही समाविष्ट आहे.

हेही वाचा -Facebook allow posts against Russians : फेसबुक आणि इंस्टाग्राम रशियन लोकांच्या पोस्टना देणार परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details