वाशिंग्टन : अमेरिकेत आतापर्यंत करोडो मुलांना फ्लूची लागण झालाचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याबाबत सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने प्रकाशित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार या हंगामात आतापर्यंत 115 मुलांचा फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. सीडीसीचा हवाला देत शिन्हुआ या वृत्तसंस्थेने या हंगामात आतापर्यंत किमान 25 दशलक्ष मुले फ्लूमुळे प्रभावित झाली आहेत. त्यापैकी 2 लाख 80 हजार मुले रुग्णालयात दाखल झाली आहेत. तर धक्कादायक बाब म्हणजे 18 हजार मुले यामुळे मृत झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एका आठवड्यात १८०० रुग्णांना केले रुग्णालयात दाखल :अमेरिकेत फ्लू वाढल्याने रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात फ्लूने ग्रस्त असलेल्या सुमारे 1800 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र देशातील फ्लू रूग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि साप्ताहिक दर आता कमी होत असल्याची माहिती सीडीसीने ( CDC ) आपल्या अहवालात दिली आहे. जोपर्यंत फ्लूचा संसर्ग सुरू आहे, तोपर्यंत सहा महिन्यापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येकाला वार्षिक फ्लूची लस देण्याची सीडीसीने शिफारस केली आहे. फ्लूवर अँटीव्हायरल औषधे देखील उपलब्ध असल्याचे सीडीसीने सांगितले आहे. त्याचा वापर फ्लूच्या आजारावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र शक्य तितक्या लवकर उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचेही सीडीसीने नमूद केले आहे.
कोविडच्या संसर्गास कारणीभूत होते एक्सबीबी :अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झापाट्याने झाला होता. कोरोनामुळे हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा COVID-19 प्रसार होण्यास एक्सबीबी ( Omicron sub-variant XBB.1.5 ) हे 85 टक्के जबाबदार असल्याची माहिती सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या अहवालानुसार वर्तवण्यात आले आहे. एक्सबीबी ( XBB.1.5 ) चा प्रसार गेल्या वर्षाच्या अखेरीपासून वाढत आहे. गेल्या आठवड्यात प्रसार ७९.२ टक्के आणि दोन आठवड्यांपूर्वी ७१.९ टक्के झाल्याची माहितीही शिन्हुआ या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.