हैदराबाद - ध्वनी प्रदुषणाने पक्षी आणि प्राण्यांना जगणे कठीण होते. विविध संशोधनाअंती ध्वनी प्रदुषणाचे प्राणी व पक्ष्यांच्या मानसिक आणि वर्तनावर परिणाम होत असल्याचे दिसून आले. यामध्ये पक्षी व प्राण्यांच्या प्रजननसह तणावाच्या समस्यांचा समावेश आहे. हे संशोधन युरोपसह उत्तर अमेरिकेत करण्यात आले आहे.
फटाक्यांच्या प्रदूषणाला विरोध करणारे डॉ. खन्ना म्हणाले की, गोंगाटाने प्राण्यांच्या मज्जातंतुंना हानी होण्याची शक्यता असते.
गोंंगाटाने ह्रदयाचे ठोके वाढणे आणि तणावाची पातळी वाढणे असे प्राण्यांवर परिणाम होतात.
एक्स्टर विद्यापीठाने २०१४ मध्ये संशोधन करून मोठ्या गोंगाटाचा ईल प्राण्यांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला आहे.
या संशोधनात गोंगाटामुळे प्राण्यांमधील तणाव वाढत असल्याचे आढळले आहे.
व्हर्जिनिया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून गोंगाटामुळे पक्ष्यांच्या प्रजजन कालावधीवर परिणाम होत असल्याचे आढळले आहे.