न्यूयॉर्क - भूभर्गातील पाण्याचा उपसासारखा मानवीय हस्तक्षेप आणि नैसर्गिक आपत्तीने भूस्खलनाच्या घटनात वाढ होणार आहे. त्याचा जगभरातील ६.३५ कोटी लोकांना चार वर्षात फटका बसेल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. यामधील बहुतांश नागरिक आशियामधील असणार आहेत, असेही संशोधकांनी म्हटले आहे.
भूस्खलनाच्या घटनांनी पुढील चार वर्षात ९.७८ लाख कोटी डॉलर जीडीपीचे नुकसान होणार आहे. भूस्खलनासह इतर नैसर्गिक आपत्तीने २०२४ पर्यंत नुकसान होणार असल्याचे जर्नल सायन्स या संशोधनपत्रिकेत म्हटले आहे.
हेही वाचा-पिण्याच्या बॉटलवर माहिती देण्याकरता सरकारकडून कंपन्यांना मुदतवाढ
भूस्खलनाच्या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी जगभरात परिणामकारक पावले उचलण्याची गरज असल्याचे संशोधन पत्रिकेत म्हटले आहे. भूसंशोधक घेराडो हेर्रेरिया गार्सिया म्हणाले की, भूगर्भातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यामुळे ३४ देशांमधील २०० ठिकाणी भू-भाग कमी झाला आहे. संशोधकांच्या टीमने स्थानिक आणि सांख्यिकीय विश्लेषणाची जोड देऊन एक मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल उपाययोजना सुचवत नाही. मात्र, येत्या दशकांमध्ये जागितक लोकसंख्या, आर्थिक प्रगती या कारणांनी भूभागाचे प्रमाण कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-रिलायन्स इंडस्ट्रीजसह मुकेश अंबानी यांना सेबीकडून ४० कोटींचा दंड