महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

सावधान! कॉन्टॅक्ट लेन्समधून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका; येवू शकते अंधत्व - ICMR research on contract lens use

इंडियन जर्नल ऑफ मेडिलक रिसर्च (आयजेएमआर) हे भारतीय वैद्यकीय संशोधनकडून (आयसीएमआर) प्रसिद्ध होणारे सर्वात जुने वैद्यकीय जर्नल आहे. या जर्नलमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांना होणारा कोरोनाचा धोका स्पष्ट करण्यात आला आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Aug 20, 2020, 8:16 PM IST

Updated : Feb 16, 2021, 7:31 PM IST

नवी दिल्ली –तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे वैद्यकीय संशोधनातून स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे कॉन्टॅक्स लेन्स वापरणाऱ्यांना अंधत्व व कोर्नियलचे प्रत्यारोपण करण्याचा धोका असतो, असे आयजेएमआरच्या संशोधनात म्हटले आहे.

इंडियन जर्नल ऑफ मेडिलक रिसर्च (आयजेएमआर) हे भारतीय वैद्यकीय संशोधनकडून (आयसीएमआर) प्रसिद्ध होणारे सर्वात जुने वैद्यकीय जर्नल आहे. या जर्नलमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांना होणारा कोरोनाचा धोका स्पष्ट करण्यात आला आहे.

डोळ्यांना बहुस्तरीय होणारे रोग होतात. मात्र, कॉन्टॅक्ट लेन्समध्ये असा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र बाह्य परजीवीमुळे असा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अशा संसर्गामुळे डोळ्यांना अंधत्व येवू शकते. त्यामुळे कोर्नियलचे प्रत्यारोपण करण्याची गरज भासू शकते. हवेतील कोणत्याही पृष्ठभागावर असलेल्या थुंकीच्या थेंबातून संसर्ग होवू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या विषाणुमुळे प्राणी आणि माणसांमध्ये गुंतागुंतीची समस्या निश्चितपणे होवू शकते. त्यामुळे सार्स कोव्हिड-2 चा डोळ्यांच्या पेशींना संसर्ग होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशामध्ये सुमारे 10 लाखांहून अधिक लोक कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. ही संख्या दरवर्षी 15 ते 20 टक्क्यांनी वाढते. तर जगभरात कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांची सुमारे 140 दशलक्ष संख्या आहे.

डोळ्यातील अश्रुमध्येही कोरोनाचा विषाणू सापडलेला आहे. मात्र, त्यामधून कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण 3 टक्क्यांहून कमी आहे. श्वसनास त्रास होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या थुंकीच्या थेंबातून कोरोनाचा संसर्ग होतो. यामधून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. आयजेएमआरने याबाबत अधिक संशोधन करण्याची गरज व्यक्त केली आहे.

Last Updated : Feb 16, 2021, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details