नवी दिल्ली - अॅमेझॉनने २६ पवनचक्क्या आणि काही सौर प्रकल्पांची खरेदी केली आहे. त्यामुळे अॅमेझॉन ही अक्षय्य उर्जेची खरेदी करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
ETV Bharat / science-and-technology
अॅमेझॉन ठरली अक्षय्य उर्जेची खरेदी करणारी जगातील प्रथम क्रमांकाची कंपनी - Amazons commitment on carbon neutral
कंपनीला लागणाऱ्या गरजेची पूर्तता ही अक्षय्य उर्जेच्या प्रकल्पामधून पूर्ण करण्याचा अॅमेझॉनचा प्रयत्न आहे. अॅमेझॉनकडे २०१५ पासून एकूण १२७ पवन उर्जा प्रकल्प आणि सौर उर्जा प्रकल्प आहेत. त्यामधून ६.५ गिगावॅटची उर्जानिर्मिती होते. यामधून अमेरिकेतील १.७ दशलक्ष घरांना वीज मिळू शकते.
अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस म्हणाले, की आम्ही २०२५ पर्यंत सर्व व्यवसाय अक्षय्य उर्जेवर चालविणार आहोत. हे पूर्वीच्या २०३० च्या उद्दिष्टाहून पाच वर्षे कमी आहे. हवामानाबद्दल वचनबद्धता दाखविण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यापैकी हे एक पाऊल असल्याचे जेफ यांनी म्हटले आहे. यापूर्वी गुगलने २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात अक्षय्य उर्जेसाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची खरेदी केली होती.
- अॅमेझॉनचे नवीन प्रकल्प हे ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, दक्षणि आफ्रिका, स्वीडन, इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये आहेत. या प्रकल्पांमधून ३.४ गिगावॅट्सची वीजनिर्मिती होती. मात्र, कंपनीने प्रकल्पाच्या निर्मितीचा एकूण खर्च जाहीर केला नाही.
- अॅमेझॉनकडे २०१५ पासून एकूण १२७ पवन उर्जा प्रकल्प आणि सौर उर्जा प्रकल्प आहेत. त्यामधून ६.५ गिगावॅटची उर्जानिर्मिती होते. यामधून अमेरिकेतील १.७ दशलक्ष घरांना वीज मिळू शकते.
- प्रत्यक्षात, मात्र अॅमेझॉनची गरज ही एखाद्या घरातील वीजनिर्मितीहून जास्त असते. अॅमेझॉनच्या डाटा सेंटरला १०० मेगावॅटची गरज भासते. ही वीजेची गरज ८० हजार कुटुंबाच्या गरजेएवढी आहे.
कंपनीला लागणाऱ्या गरजेची पूर्तता ही अक्षय्य उर्जेच्या प्रकल्पामधून पूर्ण करण्याचा अॅमेझॉनचा प्रयत्न आहे.