सॅन फ्रान्सिस्को : सॅमसंग आपल्या ग्राहकांना नेहमीच काही नवीन फिचर देत असतो. त्यामुळेच सॅमसंगच्या फोनची ग्राहकांमध्ये मोठी क्रेझ आहे. आता सॅमसंगने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold 5 मध्ये 6.2 इंचाची बाह्य स्क्रीन ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. ( Samsung Galaxy Z Fold 5 ) सॅमसंग आपल्या आगामी Z Fold 5 फोनच्या बाह्य डिस्प्लेचा आकार 6.2 इंच ठेवणार असल्याने ग्राहकांना या फोनची उत्सुकता लागली आहे. ग्राहकांना नेहमीपेक्षा सॅमसंगच्या फोनवर मोठी स्क्रिन वापरायला मिळणार आहे. सॅमसंग Z Fold 5 हा फोन कॅमेरा मॉड्यूल असल्याचा दावा टिपस्टरकडून करण्यात आला आहे.
गॅलेक्सी वॉचसोबत झेड फोल्ड 5 चे अनावरण :सॅमसंग गॅलक्सी या वर्षाच्या शेवटी नवीन फ्लिप डिव्हाइस आणि गॅलेक्सी वॉचसोबत झेड फोल्ड 5 चे अनावरण करणार असल्याची अपेक्षा आहे. यापूर्वी फोल्ड 5 या फोनमध्ये 108 MP प्राथमिक रियर कॅमेरा आणि इन-बिल्ट स्टायलस पेन (एस पेन) स्लॉटसह ग्राहकांच्या सेवेत येईल. सॅमसंग Z Fold 5 मध्ये ड्रॉपलेट स्टाईल बिजागर देखील असणार. त्यामुळे सॅमसंग Z Fold 5 या फोनच्या डिस्प्ले क्रीज कमी करेल. सॅमसंग आपल्या आगामी Galaxy Z Fold 5 स्मार्टफोनसाठी चीनी फोल्डेबल पॅनेल वापरणार नसल्याची माहितीही कंपनीने मागील महिन्यात दिली होती.