हैदराबाद : या सीरीज अंतर्गत कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी S23, गॅलेक्सी S23 प्लस आणि गॅलॅक्सी S23 अल्ट्रा लॉन्च केले आहे. यासोबतच कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सी बुक 3 अंतर्गत 4 लॅपटॉप लॉन्च केले.
सॅमसंग गॅलेक्सी S23 चे वैशिष्ट्ये :सॅमसंग गॅलेक्सी S23 स्मार्टफोन 6.1-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लाँच झाला. फोनची स्क्रीन एएमओएलइडी पॅनेल आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येते. प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगाॅन 8 जनरेशन 2 चिपसेट देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी S23 ट्रिपल रियर कॅमेरा सह येतो. एलइडी फ्लॅशसह 50MP प्राथमिक सेन्सर, 12MP दुय्यम सेन्सर आणि 10MP थर्ड लेन्स फोनच्या मागील पॅनलवर उपलब्ध आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 10 एमपी फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये 3,900 mAh बॅटरी आहे. गॅलेक्सी S23 ची किंमत अमेरिकेत $799 असेल, जी भारतीय रुपयात अंदाजे 65,486 रुपये आहे. प्रोसेसर : क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगाॅन 8 जनरेशन 2, डिस्प्ले: 6.6 इंच, कॅमेरा: 50MP + 12MP + 10MP, सेल्फी कॅमेरा: 12MP, बॅटरी: 4700 mAh, गॅलेक्सी S23+ ची किंमत यूएस मध्ये $999 असेल, जी अंदाजे 81,878 रुपये आहे.
सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्राचे वैशिष्ट्ये :डिस्प्ले: 6.8 इंच, 1440 x 3088 पिक्सेल रिझोल्यूशन, सुरक्षा: इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, प्रोसेसर: ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 चिपसेट, कॅमेरा: 200 मेगा पिक्सेल + 12 मेगा पिक्सेल+ 12 मेगा पिक्सेल, सेल्फी कॅमेरा: 12 मेगापिक्सेल बॅटरी: 5000mAh बॅटरी. सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्राची किंमत US मध्ये $1,199 असेल, जी भारतीय रुपयात अंदाजे 98,271 रुपये आहे. आजच्या मेगा इव्हेंटमध्ये सॅमसंग गॅलेक्सी बुक 3 अंतर्गत 4 लॅपटॉप लॉन्च करण्यात आले. ज्यामध्ये गॅलेक्सी बुक 3 प्रो, गॅलेक्सी बुक 3- 360, गॅलेक्सी बुक 3 प्रो 360 आणि गॅलेक्सी बुक 3 अल्ट्रा यांचा समावेश आहे.
गॅलेक्सी बुक 3 प्रो 360 चे वैशिष्ये : डिस्प्ले: 1080p रिझोल्यूशनसह 15.6-इंचाचा IPS 16:9 डिस्प्ले, 60Hz रिफ्रेश रेट आणि 300nits पर्यंत ब्राइटनेस, प्रोसेसर: Galaxy Book 3 मधील Intel Core i3-1315U, i5-1335U, किंवा i7-1355U प्रोसेसर आणि गॅलेक्सी बुक 3- 360 मध्ये इंटेल कोअर i5-1340P किंवा i7, ग्राफिक्स: इंटेल आयरिस XE ग्राफिक्स, 3.5mm ऑडिओ जॅक, 1x थंडरबोल्ट 4, 1x USB A 3.2 Gen 1, 1x USB-C 3.2 Gen 2, HDMI, बॅटरी: 13.3-इंच बुक 3 360 मध्ये 61.1Wh बॅटरी, 15.6-इंच आवृत्तीमध्ये 68Wh बॅटरी आणि बुक 3 मध्ये 54Wh बॅटरी.
हेही वाचा :मेटाकडून नाविन्यपूर्ण लॉगिन प्रणालीची घोषणा, वाचा सविस्तर