टेक्सास :उर्जा वाढवण्यासाठी मीठ महत्वाची भूमीका बजावू शकत असल्याचे टेक्सासच्या अभ्यासातून उघड झाले आहे. ऑस्टीन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या ब्युरो ऑफ इकॉनॉमिक जिऑलॉजीने हे संशोधन प्रायोजित केले आहे. त्यानुसार कमी कार्बन उर्जा स्त्रोतांमध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी मीठ महत्वपूर्ण भूमीका बजावू शकतो. हायड्रोजनच्या साठवण टाक्यांना उष्णता पुरवण्यासाठी किवा कार्बनच्या साठ्यांवर उष्णतेचा वापर करण्यासाठी मीठाचा वापर केला जाऊ शकतो, हे या संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
टेकटोनिका जर्नलमध्ये प्रकाशित झाले संशोधन :टेक्सासच्या ब्युरो ऑफ इकॉनॉमिक जिऑलॉजीने केलेल्या या संशोधनाची सविस्तर माहिती टेकटोनिका जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. त्यात या संशोधनाचे प्रमुख आणि ब्यूरोचे संशोधन शास्त्रज्ञ ऑलिव्हर डफी यांनी अनेक दशकांच्या संशोधनातून मीठाच्याबाबत आम्हाला अनेक माहिती उघड झाल्याचे सांगितले आहे. यात हायड्रोकार्बनचे संशोधन आणि मीठागरातील ऊर्जा संक्रमण तंत्रज्ञानामध्ये वापरण्याची आम्हाला क्षमता दिसते असेही संशोधक ऑलिव्हर डफी यावेळी म्हणाले. शेवटी मीठाचे वर्तन आहे, याचे सखोल आकलन आम्हाला डिझाइन ऑप्टिमाइझ करण्यास आणि जोखीम कमी करण्यासह ऊर्जा संक्रमण तंत्रज्ञानाच्या श्रेणीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या थरांना आकार :पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या थरांना आकार देण्यामध्ये मिठाची मोठी भूमिका असल्याचे या संशोधकांनी आपल्या संशोधनात नमूद केले आहे. भूगर्भीय शक्तींद्वारे ते सहजपणे जटिल आणि मोठ्या निक्षेपांमध्ये पिळून काढले जाते. काही भूपृष्ठावरील मीठ संरचना माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. या संरचना आणि त्यांच्या सभोवतालचे भूविज्ञान ऊर्जा विकास आणि उत्सर्जन व्यवस्थापनासाठी अनेक संधी देतात असे या संशोधनाच्या सहलेखिका तथा ब्यूरोच्या स्टेट ऑफ टेक्सास अॅडव्हान्स्ड रिसोर्स रिकव्हरी (STARR) च्या संचालक लोरेना मॉस्कार्डेली यांनी सांगितले. पृष्ठभागाच्या पायाभूत सुविधांचे सहस्थान, नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता आणि अनुकूल भूपृष्ठावरील परिस्थितीसह बाजारपेठेची समीपता ही सबसर्फेस हायड्रोजन स्टोरेजची योजना असल्याचेही लोरेना मॉस्कार्डेली यांनी यावेळी स्पष्ट केले.