बेंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) मंगळवारी चांद्रयान-3 प्रकल्पाशी संबंधित आणखी एक अपडेट शेअर केले. चांद्रयान-3 रोव्हरवर असलेल्या लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी (LIBS) उपकरणाने दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागाच्या मूलभूत रचनेवर प्रथमच इन-सीटू मोजमाप केलं, असं अवकाश संस्थेनं म्हटलं आहे. हे इन-सीटू मोजमाप या प्रदेशात सल्फर (एस) च्या उपस्थितीची पुष्टी करतात, जे ऑर्बिटर्सवरील उपकरणांद्वारे व्यवहार्य नव्हतं.
इन-सिटू वैज्ञानिक प्रयोग प्रगतीपथावर : रोव्हरवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) उपकरणाने प्रथमच इन-सीटू मापनाद्वारे दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फरच्या उपस्थितीची स्पष्टपणे पुष्टी केली आहे. अपेक्षेप्रमाणे Al, Ca, Fe, Cr, Ti, Mn, Si, आणि O देखील सापडले आहेत. हायड्रोजन (H) चा शोध चालू आहे. LIBS इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम (LEOS)/ इस्रोच्या प्रयोगशाळेत विकसित, बेंगळुरू," इस्रोने X (पूर्वीचे ट्विटर) वर आपल्या नवीनतम पोस्टमध्ये म्हटले आहे.
एक वैज्ञानिक तंत्र: एलआयबीएस ( LIBS ) हे एक वैज्ञानिक तंत्र आहे जे प्रखर लेसर पल्स संपर्कात आणून सामग्रीच्या संरचनेचे विश्लेषण करते. उच्च-ऊर्जा लेसर पल्स हे खडक किंवा माती यांसारख्या सामग्रीच्या पृष्ठभागावर केंद्रित आहे. लेसर पल्स अत्यंत गरम आणि स्थानिकीकृत प्लाझ्मा तयार करते. गोळा केलेला प्लाझ्मा लाइट स्पेक्ट्रली विघटित होते आणि चार्ज कपल्ड उपकरणांसारख्या डिटेक्टरद्वारे शोधल जातं. प्रत्येक घटक प्लाझ्मा स्थितीत असताना प्रकाशाच्या तरंगलांबीच्या विशिष्ट संचाचे उत्सर्जन करत असल्याने, सामग्रीची मूलभूत रचना निर्धारित केली जाते.
चंद्राच्या पृष्ठभागावर आहेत 'हे' घटक : ग्राफिक पद्धतीने दाखविलेल्या प्राथमिक विश्लेषणांनी चंद्राच्या पृष्ठभागावर ॲल्युमिनियम (Al), सल्फर (S), कॅल्शियम (Ca), लोह (Fe), क्रोमियम (Cr) आणि टायटॅनियम (Ti) असल्याचे उघड केलं आहे. पुढील मोजमापांवरून मॅंगनीज (Mn), सिलिकॉन (Si) आणि ऑक्सिजन (O) असल्याचे दिसून आलं. हायड्रोजनच्या अस्तित्वाबाबत सखोल तपास सुरू आहे. एलआयबीएस ( LIBS ) पेलोड इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS)/ISRO, बेंगळुरूच्या प्रयोगशाळेत विकसित केलं गेलंय.
हेही वाचा :
- ISRO Job : इस्रोमध्ये करिअर करायचयं ? जाणून घ्या सविस्तर
- चंद्रयान 3 देशाचा गौरव, सोनिया गांधींचे इस्रो प्रमुखांना अभिनंदन पत्र
- Chandrayaan 3 : चंद्रयान-3 लँडिंगसाठी अंतराळवीर सुनीता विल्यम्सही उत्सुक...