कर्करोगाच्या उपचारांमुळे रुग्णावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. केमोथेरपी, कर्करोगाच्या उपचारांचा एक भाग आहे. ही थेरीपी ट्यूमरवर हल्ला करण्याव्यतिरिक्त, निरोगी पेशींवर देखील हल्ला करते. इम्युनोथेरपी, जी रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी आणि त्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न करते. या उपचारांमुळे रुग्णांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. ही थेरपी केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी डिझाइन केलेली असेल तरी त्याचे दुष्परिणाम कमी केले जाऊ शकत नाही. जगभरातील शास्त्रज्ञ कर्करोगावर सुरक्षित उपचार शोधण्याचे काम करत आहेत. दरम्यान, अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील संशोधकांनी कर्करोगावर एक अभिनव पध्दत शोधून काढली आहे. या पद्धतीमुळे रुग्णाच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
मानवी शरीराची जन्मजात रोगप्रतिकार प्रणाली साइटोकाइन्स नावाच्या प्रथिनेद्वारे येणाऱ्यां धोक्यांना उत्तर देते. यात पेशीं कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करू शकतात. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सायटोकाइन्स कर्करोगाच्या उपचारासाठी एक अद्भुत साधन असू शकते. ते ट्यूमरला मारण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला प्रोत्साहन देते. हे औषध 30 वर्षांपूर्वी शोधून काढले असले तरी, त्याला FDA ने मान्याता दिलेली नाही. IL-12 मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक पेशी तयार करतात ज्यामुळे शरीराला नुकसान होते. निरोगी पेशींनी हानी न पोहचता कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी नविव औषध सक्षम असणार आहेत.
कर्करोगाच्या पेशी आणि निरोगी पेशींमध्ये मुख्य फरक पहायला आढऴून येतो. कर्करोगाच्या पेशी शरीरात खूप वेगाने वाढतात. या पेशी शरीरात विशिष्ट एंजाइम तयार करून निरोगी पेशींमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे रुग्णाची प्रतिकृती खालवते. तर दुसरीकडे, निरोगी पेशी खूप कमी वेगाने वाढतात. आणि शरीरात कमी एन्झाइम तयार करतात. अमेरिकन शास्त्रज्ञांनी IL-12 ची सुरक्षित आवृत्ती विकसित करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.