न्यूयॉर्क:पुरुषांच्या शुक्राणूंचे वय ( Age of male sperm ) शोधण्याचे तंत्र शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या संशोधनानंतर पुरूषाच्या शुक्राणूंच्या साह्याने स्त्रीची गर्भधारणा होण्याची शक्यता किंवा क्षमता किती आहे, हे शोधणे सोपे होणार आहे. यासंदर्भात वेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेला अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासानुसार शुक्राणूंचे वय जैविक आधारावर ठरवले जाते.
अभ्यासानुसार, वृद्ध लोकांचे शुक्राणू तरुण गटाच्या शुक्राणूंपेक्षा कमकुवत असल्याचे आढळून आले. 12 महिन्यांनंतर गर्भधारणेची शक्यता तरुण शुक्राणूंच्या एपिजेनेटिक एजिंग श्रेणींच्या तुलनेत वृद्ध पुरुष भागीदार असलेल्या जोडप्यांसाठी 17 टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे आढळून आले. युनिव्हर्सिटीचे संशोधक जे रिचर्ड पिल्सनर यांच्या मते, शुक्राणूंचे कालक्रमानुसार वय ( Chronological age ) महत्त्वाचे आहे, कारण गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांमध्ये ते प्रजनन आणि यशाचे महत्त्वपूर्ण निर्धारक आहे. जरी शुक्राणूचे कालक्रमानुसार वय अनुवांशिक आधारावर तसेच अनेक बाह्य घटकांवर अवलंबून असते. पर्यावरणीय परिस्थितीमुळेही त्याचा परिणाम होतो. अशा प्रकारे ते पेशींच्या 'खऱ्या' जैविक वयाचे प्रॉक्सी माप म्हणून काम करते.