वॉशिंग्टन :चंद्रावर असलेल्या विविध संशोधनासाठी अनेक देश प्रयत्न करतात. आता तर चंद्रावरील विविध मोहिमांसाठी एमआयटीच्या ( Massachusetts Institute of Technology ) संशोधकांनी मल्टीमिशन मून रोबोट डिझाईन केला आहे. त्यामुळे चंद्रावरील मोहिमांसाठी सोलर पॅनल बसवणे, केबल टाकणे, कम्युनिकेश टॉवर उभारण्यासाठी हा रोबोट माईल स्टोन ठरणार असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
रोबोटचे भाग करता येणार वेगळे :मॅसेच्युसेटस इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठातील संशोधकांनी बनवलेला हा रोबोट अतिशय उपयुक्त असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या रोबोटची मिशन पूर्ण झाल्यावर त्याचे भाग वेगळे केले जाऊ शकतात. त्यानंतर ते वेगळ्या कामासाठीही वापरले जाऊ शकतात किवा ते नवीन रोबोट कॉन्फिगर करण्यासाठीही वापरता येत असल्याचा दावा या संशोधकांच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रणालीला वॉकिंग ऑलिगोमेरिक रोबोटिक मोबिलिटी सिस्टम (WORMS) असे म्हणतात. विविध भागांमध्ये रोबोटिक अंगांचा समावेश आहे. त्याला अंतराळवीर सहजपणे आधारासाठी पकडू शकतो. त्यानंतर त्याला चालणारा रोबोट बनवू शकतो. हा रोबोट मोठ्या पॅक बॉट्स टेकडीवर जड सौर पॅनेल वाहून नेण्यास सक्षम आहेत. त्याला सहा पायांच्या स्पायडर बॉट्समध्ये पुन्हा कॉन्फिगर केले जाऊ शकते. गोठलेल्या पाण्यात ड्रिल करण्यासाठीही त्याचा उपयोग होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.