नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवा ठप्प झाल्याने बुधवारी यूजरमध्ये हाहाकार उडाला. देशभरात मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवांचा यूजर वापर करत आहेत. मात्र मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्याने यूजर्सचा चांगलाच संताप झाला. मायक्रोसॉफ्टच्या टीम्स, आऊटलूक आणि मायक्रोसॉफ्ट 365 या सेवा ठप्प झाल्या. याबाबत मायक्रोसॉफ्टने तात्काळ आपल्या साईटवर याबाबत सेवा सुरळीत करत असल्याबाबतची माहिती दिली. मायक्रोसॉफ्टने सेवा सुरळीत करत असल्याबाबतचीही माहिती यावेळी दिली आहे.
देशभरात मायक्रोसॉफ्टचे करोडो यूजर :अमेरिकन टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवांचा करोडो यूजर वापर करतात. मात्र मायक्रोसॉफ्टच्या हजारो वापरकर्त्यांना बुधवारी चांगलाच फटका बसला. टीम्स, आऊटलूक, टीम्स, मायक्रोसॉफ्ट 365 या सेवा ठप्प झाल्या. त्यामुळे भारतातील हजारो वापरकर्त्यांना या सेवा ठप्प झाल्यांचा फटका बसला. हजारो वापरकर्त्यांनी याबाबत ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामुळे काही क्षणांतच मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि #Outlook या हॅशटॅगने सोशल माध्यमात ट्रेंड केला.
मायक्रोसॉफ्टने चौकशी करत असल्याची दिली माहिती :आऊटलूक, टीम्स आणि मायक्रकोसॉफ्ट 365 या सेवा ठप्प झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. ट्विटर आणि सोशल माध्यमात याबाबतचा मायक्रोसॉफ्ट टीम आणि आऊटलूक सारखे हॅशटॅग ट्रेंड झाला. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने अधिकृत स्टेटस अपडेट करत आम्ही मायक्रोसॉफ्ट 365 सेवा ठप्प झाल्याच्या कारणांचा शोध घेत असल्याचे जाहीर केले.