महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Meta commits $15mn to Ukraine : मेटा युक्रेनला करणार 15 कोटी रुपयांची मदत - मेटा युक्रेनला देणार 15 दशलक्ष

आम्ही युक्रेन आणि प्रदेशातील मुले ( humanitarian efforts in Ukraine ) आणि कुटुंबांसाठी युनिसेफला देणगी देत आहे. उर्वरित $10 दशलक्ष जाहिरात क्रेडिट्स मधून दिले जातील. याचा उपयोग लोकांना आवश्यक माहिती वितरीत करण्यासाठी आवश्यक निधी उभारण्यात मदत होईल.

Meta
Meta

By

Published : Mar 4, 2022, 5:02 PM IST

नवी दिल्ली :मेटाने रशियन आक्रमणादरम्यान ( Russian invasion ) युक्रेन आणि शेजारील देशांमध्ये मानवतावादी प्रयत्नांसाठी ( humanitarian efforts ) $ 15 दशलक्ष रुपयांची मदत करणार आहे. यामध्ये युनायटेड नेशन्स एजन्सीजना $5 दशलक्ष आणि इंटरनॅशनल मेडिकल कॉर्प्ससह ( International Medical Corps ) चा समावेश आहे. त्याचबरोबर या निधीचा वापर युक्रेन आणि इंटरन्यूजमध्ये मोबाइल वैद्यकीय युनिट्स तैनात करण्यासाठी आणि जोखीम असलेल्या पत्रकारांना पाठिंबा देण्यासाठी वापरला जाईल.

आम्ही युक्रेन आणि प्रदेशातील मुले आणि कुटुंबांसाठी युनिसेफला देणगी देत आहे. उर्वरित $10 दशलक्ष जाहिरात क्रेडिट्स मधून दिले जातील. याचा उपयोग लोकांना आवश्यक माहिती वितरीत करण्यासाठी आवश्यक निधी उभारण्यात मदत होईल. मेटाने गुरुवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सोशल नेटवर्कने एक विशेष ऑपरेशन सेंटर स्थापन केला असून, यात संपूर्ण कंपनीतील तज्ञांचा समावेश आहे. ज्यात मूळ रशियन आणि युक्रेनियन भाषिक आहेत.

युक्रेन रशियासाठी विशेष क्षमता

आम्ही युक्रेन आणि रशियासाठी (Ukraine and Russia) अनेक सुरक्षा वैशिष्‍ट्ये दिली आहेत. यूजर्सचे Facebook प्रोफाईल लॉक करण्‍याची क्षमता, फ्रेंड लिस्ट पाहण्‍याची आणि शोधण्‍याची क्षमता काढून टाकणे आणि मेसेंजरवरील अतिरिक्त टूल्स यांचा समावेश आहे. असे मेटाने सांगितले आहे. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये खोलवर प्रवेश केल्यामुळे मेटाने जागतिक स्तरावर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील रशियन राज्य मीडिया आउटलेट्स RT आणि स्पुटनिकवर बंदी टाकली आहे.

हेही वाचा -Instagram removes 'daily time limit' : इंस्टाग्रामने हटवले डेली लिमिट फीचर

ABOUT THE AUTHOR

...view details