नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या फास्ट-फूड चेन कंपनीपैकी एक असलेली मॅकडोनाल्ड्स कामगार छाटणीच्या टप्प्यात सामील होणार आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. मॅकडोनाल्ड या आठवड्यात अमेरिकेतील सर्व कार्यालये तात्पुरती बंद करणार आहे.
कॉर्पोरेट कर्मचार्यांना टाळेबंदी: मॅकडोनाल्डने गेल्या आठवड्यात आपल्या कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला होता. ज्यामध्ये सोमवार ते बुधवारपर्यंत त्यांना घरून काम करावे लागेल, असे सांगण्यात आले होते. अहवालानुसार कंपनीने हा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ती आपल्या कॉर्पोरेट कर्मचार्यांना टाळेबंदीच्या नवीन फेरीबद्दल सूचित करू शकेल. मात्र, किती कर्मचार्यांना कामावरून कमी केले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र बुधवारपर्यंत कपातीची घोषणा होणे अपेक्षित आहे.
मॅकडोनाल्ड्सने मेलमध्ये काय लिहिले : मॅकडोनाल्डने मेलमध्ये लिहिले आहे की, '3 एप्रिलच्या आठवड्यात, आम्ही संपूर्ण संस्थेतील कर्मचारी स्तरांशी संबंधित प्रमुख धोरणात्मक निर्णयांबद्दल माहिती देऊ. कर्मचार्यांना या आठवड्यात नियोजित सर्व वैयक्तिक बैठका रद्द करण्यास देखील सांगण्यात आले आहे.