महाराष्ट्र

maharashtra

Joe Biden On AI : एआय उत्पादने सुरक्षित असल्याची खात्री करा, टेक कंपन्यांना जो बायडन यांचे आवाहन

By

Published : Apr 5, 2023, 2:05 PM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एआयची उत्पादने सुरक्षित असल्याची खात्री करण्याचे आवाहन टेक कंपन्यांना केले आहे. त्यामुळे एआयच्या उत्पादनांवर पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Joe Biden On AI
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन

वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्ट कंपनी ओपन एआय कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करत असल्याने त्यावर मोठी टीका करण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी एआयची उत्पादने सुरक्षित असल्याची खात्री करण्याचे आवाहन टेक जगताला केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेतील जलद प्रगती वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी निर्माण होणाऱ्या धोक्याशी संबंधित आहे. त्यामुळे बायडन यांनी त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेच्या सल्लागारांची भेट घेतली.

एआय करु शकते कठीण आव्हानांना तोंड देण्यास मदत :एआय विविध रोग आणि हवामान बदलासारख्या काही कठीण आव्हानांना तोंड देण्यास मदत करू शकते. परंतु समाज, अर्थव्यवस्था आणि आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य धोका पद्धतशीरपणे हाताळणे देखील आवश्यक असल्याचे यावेळी बायडन यांनी स्पष्ट केले. या परिषदेला गुगल आणि मायक्रोसॉफ्टचे अधिकारीही उपस्थित होते.

दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये स्पर्धा :चॅट जीपीटी सुरू झाल्यानंतर सध्याच्या काळात एआय आघाडीवर आहे. मात्र एआयमुळे तंत्रज्ञानाबद्दल नैतिक आणि सामाजिक चिंता वाढवल्या आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यामध्ये यामुळे शर्यत सुरू करण्यास मदत केली. त्यामुळे जागतिक पातळीवर मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. टेक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या सुरक्षेसाठी नेहमीच जबाबदार असले पाहिजे, असे मत यावेळी जो बायडन यांनी व्यक्त केले. तर एआय वापरण्यास सुलभ असला तरी एआय टूल्सचा उदयामुळे वास्तववादी दिसणारा सिंथेटिक मीडिया तयार होऊ शकत असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी रिबेका फिनले यांनी स्पष्ट केले.

एआयचा वापर जबाबदार नवकल्पना म्हणून करावा :जो बायडन यांनी एआयबाबतची बैठक व्हाईट हाऊस येथे बोलावली होती. या बैठकीत एआय ही जबाबदार नवकल्पना म्हणून करण्यात यावा, असेही यावेळी बायडन यांनी स्पष्ट केले. योग्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्याचे हक्क आणि सुरक्षिततेचे महत्व यावरही या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान नुकताच इटलीने चॅट जीपीटीला इटलीच्या नागरिकांचा डेटा संकलित न करण्याविषयी इशारा दिला होता. तर सुप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी एआय हे मानवी कल्याणासाठी धोकादायक असल्याचे पत्र दिले होते.

हेही वाचा - Apple layoffs 2023 : मेटानंतर आता अ‍ॅप्पलही देणार कर्मचाऱ्यांना नारळ; किरकोळ विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड

ABOUT THE AUTHOR

...view details