श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी त्यांचे नवीनतम मिशन एलव्हीएम 3 - एम 3 वन वेब इंडिया 2 टू लो अर्थ ऑर्बिट (LVM3 - M3 One Web India - 2 To low earth orbit) लाँच केले. एलव्हीएम - 3 (LVM3) चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 9 वाजता करण्यात आले. अंतराळातील भारताचे हे नवे यश आहे. याद्वारे इस्रोने एकाच वेळी तब्बल 36 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.
इस्रोने एकाच वेळी 36 उपग्रह प्रक्षेपित केले : अधिकार्यांनी सांगितले की, एलव्हीएम 3, 43.5 मीटर उंच आणि 643 टन वजनी आहे. ते वनवेबच्या 36 जेन 1 उपग्रहांचा अंतिम टप्पा वाहून नेण्यासाठी दुसऱ्या लॉन्च पॅड रॉकेट पोर्टवरून प्रक्षेपित करण्यात आले आहे. ब्रिटनच्या नेटवर्क एक्सेस असोसिएट्स लिमिटेडने लो अर्थ ऑर्बिटमध्ये 72 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोसोबत करार केला आहे. यापूर्वी वनवेब ग्रुप कंपनीचे 36 उपग्रह 23 ऑक्टोबर 2022 रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते.