महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

ISRO Job : इस्रोमध्ये करिअर करायचयं ? जाणून घ्या सविस्तर - केंद्र सरकार

भारताचे चंद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरले. या मोहिमेमध्ये अनेकांनी प्रचंड प्रयत्न केले. इस्रोनं अंतराळ जगतात इतिहास रचला. इस्रोमध्ये नोकरी करण्याची अनेकांना इच्छा आहे. इस्रोमध्ये तुम्हाला करीअर करायचे असेल तर काय पात्रता आवश्यक आहे? त्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घ्या.

ISRO Job
इस्रोमध्ये करिअर

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 12:44 PM IST

हैदराबाद : भारताचे चंद्रयान 3 चंद्रावर उतरल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. भारताचं नाव चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या 4 देशांच्या यादीत सामील झालयं. अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरणारा जगातील चौथा देश ठरलाय. इस्रोच्या शास्त्रज्ञांबद्दल लोकांच्या मनात आदर आहे. लोक स्वतःचे किंवा आपल्या मुलांचे करिअर इस्रो (ISRO)मध्ये करण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

इस्रोमध्ये हे आहात करिअरचे पर्याय : इस्रोमध्ये वैज्ञानिक नोकरी ही मुख्य नोकरी आहे. इस्रो वैज्ञानिक असणं म्हणजे फक्त उत्तम करिअर नसून एक सामाजिक प्रतिष्ठादेखी आहे या करिअरमधून देशाची सेवा करण्याची संधी मिळते. इस्रोमध्ये वैज्ञानिक होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. या व्यतिरिक्त इतर भरती देखील होतात. यामध्ये ग्रुप-क आणि ग्रुप-बीची विविध पदे आहेत. यामध्ये वैज्ञानिक, फायरमन, ड्रायव्हर, डॉक्टर, नर्स, प्रोफेसर, चौकीदार, शिक्षक, इतर पदे देखील समाविष्ट आहेत. पदांसाठीची पात्रता पदांच्या भरती अधिसूचनेसह प्रसिद्ध केली जाते.

  • अंतराळ विज्ञान म्हणजे काय? अंतराळ विज्ञान हा एक बहुविद्याशाखीय विषय आहे. यामध्ये सर्व वैज्ञानिक विषयांचा तसेच वैशिष्ट्यांचा समाविष्ट आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपकरणांच्या सहाय्याने, शास्त्रज्ञ मानवाशी संबंधित समस्यांचे विश्लेषण आणि निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये वाढती लोकसंख्या, ग्लोबल वार्मिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा आदी विषयांचा समावेश आहे.

असे करा अंतराळ विज्ञानात करिअर : अंतराळ विज्ञानात डिझाइन, गेमिंग आणि औषधांसह विविध क्षेत्रातील व्यावसायिकांचा सहभाग असतो. अंतराळ मोहीम यशस्वी करण्यासाठी अंतराळवीरांव्यतिरिक्त हजारो शास्त्रज्ञ आणि अभियंतेदेखील सहभागी असतात. तर खगोलभौतिकशास्त्रज्ञांचा मुख्य अभ्यास म्हणजे जीवनाची उत्पत्ती आणि पृथ्वीच्या पलीकडे जीवनाची शक्यता वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात शोधणे हा असतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIST) ही एक सरकारी अनुदानित संस्था आहे. अंतराळ विज्ञानाच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी या विद्यापीठात मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात. आयआयएसटी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये अंडरग्रेजुएट (बीटेक), मास्टर्स (एमटेक) आणि पीएचडी प्रोग्राम ऑफर करते. हे विद्यापीठ संशोधन केंद्र म्हणूनही काम करते. या विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थांना इस्रोमध्ये करिअर करण्याची संधी मिळते.

कशी होते इस्रोमध्ये वैज्ञानिकांची भरती :इस्रोचे वैज्ञानिक बनणे हा एक उत्तम करिअरचा पर्याय मानला जातो. इस्रोमध्ये वैज्ञानिक होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्ड (ICRB) द्वारे इस्रोच्या विविध अंतराळ केंद्रे आणि विभागांसाठी शास्त्रज्ञांची भरती वेळोवेळी केली जाते. या रिक्त पदांसाठीची अधिसूचना मंडळाने इस्रो वेबसाइटच्या करिअर विभागात शेअर केली आहे. isro.gov.in/Careers ही वेबसाइट आहे. उमेदवार येथे दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सबमिट करू शकतात.

  • पात्रता काय असावी ?इस्रोच्या विविध केंद्रांसाठी शास्त्रज्ञ पदांच्या थेट भरतीसाठी, उमेदवारानं भरतीशी संबंधित विषयात किमान 65% गुणांसह BE/B.Tech किंवा इतर कोणतीही पदवीधर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना (SC-ST, OBC, EWS, दिव्यांग इ.) केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

हेही वाचा :

  1. Mike Gold on Chandrayaan 3 : नासाच्या अधिकाऱ्याकडून चंद्रमोहिमेचे कौतुक; म्हणाले चंद्रयान 3 मोहीम आधीच आहे यशस्वी..
  2. Chandrayaan 3 : चंद्रयान-3 लँडिंगसाठी अंतराळवीर सुनीता विल्यम्सही उत्सुक...
  3. चंद्रयान 3 देशाचा गौरव, सोनिया गांधींचे इस्रो प्रमुखांना अभिनंदन पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details