महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

नवीन पिढीतील उपग्रह विकसित करण्याच्या पर्यायांवर विचार सुरू- इस्रोमधील मुख्य विज्ञान समितीचे अध्यक्ष - अ‌ॅस्ट्रोसॅट मोहिम यश

अ‌ॅस्ट्रोसॅट ही मोहिम खूप यशस्वी झाली आहे. त्याच्या परिणामांची जगभरात दखल घेण्यात आली आहे. या मोहिमेला मंगळवारी सहा वर्षे पूर्ण झालाी आहेत.

इस्रोमधील मुख्य विज्ञान समितीचे अध्यक्ष
इस्रोमधील मुख्य विज्ञान समितीचे अध्यक्ष

By

Published : Sep 28, 2021, 7:56 PM IST

बंगळुरू- नवीन पिढीतील अवकाश विज्ञान उपग्रह विकसित करण्याच्या पर्यायांवर इस्रोकडून विचार सुरू आहे. अवकाश विज्ञानाला समर्पित इस्रोची पहिला मिशन अ‌ॅस्ट्रोसॅट ही 28 सप्टेंबर 2015 रोजी सुरू झाली होती. या मोहिमेला मंगळवारी सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

इस्रोमधील मुख्य विज्ञान समितीचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार म्हणाले, की अ‌ॅस्ट्रोसॅट मिशन आणखी काही वर्षे चालण्याची आशा आहे. कुमार यांनी इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष म्हणून मिशन टीमचे नेतृत्वही केले आहे. पुढे ते म्हणाले, की आम्हाला काही आणखी परिणाम दिसण्याची आशा आहे. त्यामुळे नवीन दिशा मिळू शकेल.

हेही वाचा-अ‌ॅपलकडून आयफोन 13 लाँच; जाणून घ्या, किमतीसह वैशिष्ट्ये

येणाऱ्या पिढीसाठी अवकाश उपग्रह विकसित करण्याच्या शक्यतेवरही विचार

इस्रोद्वारा अ‌ॅस्ट्रोसॅट-2 लाँच करण्याच्या शक्यतेबद्दल किरण कुमार म्हणाले, की केवळ अ‌ॅस्ट्रोसॅट-2 नाही, तर येणाऱ्या पिढीसाठी अवकाश उपग्रह विकसित करण्याच्या शक्यतेवरही विचार केला जाणार आहे. हे सर्व योजनेवर अवलंबून आहे. अ‌ॅस्ट्रोसॅटवर वेगळ्या पद्धतीने काम करण्यावर विचार सुरू आहे.

हेही वाचा-एका दिवसात 600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री

अ‌ॅस्ट्रोसॅट ही मोहिम खूप यशस्वी

अ‌ॅस्ट्रोसॅट ही मोहिम खूप यशस्वी झाली आहे. त्याच्या परिणामांची जगभरात दखल घेण्यात आली आहे. त्याबाबत मोठ्या प्रमाणात पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत. इस्रोच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अ‌ॅस्ट्रोसॅटचा डाटा व्यापक स्वरुपात अवकाश विज्ञानाच्या विविध क्षेत्रांच्या अभ्यासासाठी केला जाणार आहे.

हेही वाचा-व्हॉट्सअपला दणका; आयरीश देशाने ठोठावला 26.7 कोटी डॉलरचा दंड

अ‌ॅस्ट्रोसॅटने शोधली तब्बल ९.३ बिलियन प्रकाशवर्षे दूरची तारांकित आकाशगंगा

भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी अवकाशातील दूरवरच्या एका तारांकित आकाशगंगेचा सप्टेंबर 2020 मध्ये शोध लावला आहे. ही आकाशगंगा तब्बल ९.३ बिलियन प्रकाशवर्षे दूर आहे. देशातील पहिली मल्टी-वेव्हलेन्थ अवकाश वेधशाळा 'अ‌ॅस्ट्रोसॅट'चे हे मोठे यश मानण्यात आले. 'नासा' या अवकाश संशोधन संस्थेने अ‌ॅस्ट्रोसॅटचे अभिनंदन केले होते. विज्ञान हे एकमेकांच्या सहकार्याने पुढे जात असते, अशा शोधांमुळे मानवजातीला आपण कुठून आलो आहोत, कुठे जात आहोत, आणि अंतराळात आपण एकटेच आहोत का? याबाबतच्या आपल्या माहितीमध्ये वाढ होत जाते, असे नासाने म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details