महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

iPhone 15 Pro, Pro Max unveiled : आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स लॉन्च; किंमत लाखाच्या आत

iPhone 15 Pro, Pro Max unveiled : आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे अ‍ॅपलचे वजनाने आतापर्यंतचे सर्वात हलके मॉडेल असतील. कारण त्यांची रचना एरोस्पेस-ग्रेड टायटॅनियमसह येते जी मजबूत परंतु हलकी आहे. iPhone 15 Pro ची सुरुवात $999 किंवा $41.62 प्रति महिना 128GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज क्षमतांमध्ये उपलब्ध आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 5:06 PM IST

हैदराबाद :iPhone 15 Pro, Pro Max unveiled : अ‍ॅपलने कॅलिफोर्नियातील अ‍ॅपल मुख्यालयाच्या 'स्टीव्ह जॉब्स थिएटर' येथे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max फोन लॉन्च केले आहेत. या दोन्ही अ‍ॅपल फोनच्या प्री-ऑर्डर 15 सप्टेंबरपासून सुरू होतील. परंतु भारतात iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील. तुम्ही मुंबई किंवा दिल्लीचे असाल तर अ‍ॅपल स्टोअरला जाऊन हे फोन बुक करू शकता. इतर शहरातील लोक अ‍ॅपलच्या अधिकृत साइटला भेट देऊन iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max फोन बुक करू शकतात. आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स फोनमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया.

iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max चे स्वरूप : जिथे iPhone 15 Pro मध्ये 6.1 इंच HDR डिस्प्ले मिळेल. तर iPhone 15 Pro Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असेल. या दोन्ही अ‍ॅपल फोनमध्ये डायनॅमिक आयलंड फीचर उपलब्ध असेल. तसेच iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बॅटरी 100 टक्के रिसायकल मटेरियलपासून बनवल्या गेल्या आहेत.

iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max ची वैशिष्ट्ये : अ‍ॅपलचा iPhone 15 Pro आणि Pro Max टायटॅनियम डिझाइनसह लॉन्च करण्यात आला आहे. यात कस्टमाइज अ‍ॅक्शन बटण आणि नेक्स्ट जनरेशन पोर्ट्रेटची सुविधा असेल. आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स ब्लॅक टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम आणि नॅचरल टायटॅनियम अशा चार रंगांमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. यावेळी नवीन iPhone 15 सिरीजमध्ये यूजर्सना चार्जिंगसाठी USB Type-C पोर्टचा सपोर्ट मिळेल. म्हणजेच लाइटनिंग पोर्ट फोनमधून काढून टाकण्यात आले आहे. हा पोर्ट आता बहुतेक नवीन Androids मध्ये आढळतो. iPhone 15 Pro आणि Pro Max च्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या मागील पॅनलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 48MP मुख्य पोर्ट्रेट कॅमेरा उपलब्ध असेल, जो रात्रीच्या मोडमध्ये उत्कृष्ट फोटो क्लिक करतो. एक नवीन 24MP फोटोनिक कॅमेरा उपलब्ध असेल, जो सानुकूलित कॅमेरा अनुभव देईल. तसेच तिसऱ्या कॅमेरामध्ये 5X ऑप्टिकल झूमसह 12MP टेलिफोटो कॅमेरा असेल.

iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max ची किंमत : अ‍ॅपलने iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ची किंमत iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max च्या बरोबरीने ठेवली आहे. जिथे अ‍ॅपलने iPhone 15 Pro चा 128 GB स्टोरेज प्रकार $999 मध्ये (रु. 82828) लॉन्च केला आहे. तर iPhone 15 Pro Max $1199 मध्ये (रु. 99476) लॉन्च करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. IPhone 15 launch date : IPhone 15ची लाँच तारीख झाली जाहीर; हे असतील अप्रतिम फीचर्स...
  2. Recovery Of Lost Mobile : हरवलेले मोबाईल रिकव्हर करण्यात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक
  3. Introducing JioBook from Reliance Retail : रिलायन्सने सादर केले मल्टीटास्क स्क्रिनसह नवीन जिओबुक

ABOUT THE AUTHOR

...view details