हैदराबाद : IPhone 15 launch date आयफोन १५ सीरीज लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनीने iPhone 15 सीरीजची लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. अॅपलचा कार्यक्रम १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कॅलिफोर्नियातील अॅपल पार्क कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात कंपनी iPhone 15 सीरीज लाँच करणार आहे. याशिवाय Apple Watch Series 9 आणि Apple Watch 2 Ultra देखील लॉन्च केले जाऊ शकतात. यासोबतच १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात IOS 17, iPadOS 17, WatchOS 10 आणि tvOS 10 चीही घोषणा केली जाऊ शकते. (iphone 15 launch date 2023)
iPhone 15 सीरीजची वैशिष्ट्ये:iPhone 15 सीरीजमध्ये कंपनी चार स्मार्टफोन आणू शकते. यामध्ये iPhone 15, 15 Pro, 15 Plus आणि 15 Ultra यांचा समावेश असू शकतो (iphone 15 ultra price). लीक झालेल्या माहिती नुसार, iPhone 15 आणि 15 Pro मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. दुसरीकडे, 15 प्लस आणि 15 अल्ट्राला 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले मिळू शकतो. Apple iPhone सीरीजमध्ये हे फोन A17 Bionic चिपसेट सह येऊ शकतात. iPhone 15 सीरीजमध्ये 48-मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप मिळेल. Tipster Ice Universe च्या मते, iPhone 15 Ultra मध्ये Sony IMX903 सेन्सर असू शकतो. यासोबतच, iPhone 15 Ultra ला एक मोठा डिस्प्ले आणि 10X पेरिस्कोप लेन्स मिळू शकतो. फास्ट चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप सी मिळेल. कंपनी iPhone 15 Pro ला ग्रे आणि ब्लू कलर पर्यायांमध्ये आणू शकते. दुसरीकडे, आयफोन 15 आणि 15 प्लस हलक्या हिरव्या रंगात सादर केले जातील. (iPhone 15 Pro launch date)