हैदराबाद : आण्विक स्फोटांच्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. सुरक्षित, अण्वस्त्रमुक्त जगाला प्रोत्साहन देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. हा दिवस अण्वस्त्र चाचणीच्या आपत्तीजनक परिणामांची आठवण करून देतो.
असा आहे इतिहास : 29 ऑगस्ट 1991 रोजी सेमीपलाटिंस्क अणुचाचणी साइट बंद झाली. त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ 29 ऑगस्टची अणुचाचण्यांविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून निवड करण्यात आली. 2 डिसेंबर 2009 रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे हे घोषित करण्यात आलं. आण्विक स्फोटांच्या परिणामांबद्दल आणि अण्वस्त्र-मुक्त जगाच्या दिशेने काम करण्याची गरज आहे. त्यामुळे या दिवशी याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. हा दिवस अणुचाचण्या बंद करण्यासाठी समर्थन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे, सदस्य राष्ट्रे, संस्था आणि माध्यमांसह विविध संस्थांना एकत्र आणते.
अणुचाचण्यांविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवसाचे महत्त्व :
- आण्विक चाचण्यांविरूद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस अणुयुद्ध आणि त्याचे भयंकर परिणाम टाळण्यासाठी पाळला जातो.
- अण्वस्त्र चाचणीने मानवी आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हींवर कायमस्वरूपी प्रभाव पडतात. आयनीकरण रेडिएशनमुळे मोठ्याप्रणात हानी होते. तसेच हवा, माती आणि पाणी दूषित होते.
- आण्विक चाचणीच्या आरोग्यावरील नकारात्मक परिणामांमुळे महिला आणि मुले यांच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
- सर्व प्रकारच्या अण्वस्त्रांच्या चाचणी आणि वापरावर बंदी घालण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं जातं.
अण्वस्त्र चाचण्यांचे परिणाम :
- अण्वस्त्र चाचणीं मानव आणि पर्यावरण या दोघांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाले आहेत. ज्यामुळे कर्करोग, अनुवांशिक आजार आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होतात.
- किरणोत्सर्गी कण पर्यावरण दूषित करतात. त्यामुळे वनस्पती, प्राणी आणि सागरी जीवनाला हानी पोहोचते.
- आण्विक चाचण्यांच्या सक्तीमुळे परिसंस्थेवर आणि प्रवाळांवर हानीकारक परिणाम झाले आहेत.
- अण्वस्त्रांच्या चाचणीमुळे महिला आणि मुलांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे जन्मजात विकृती आणि अकाली मृत्यू होतो.
मागील अणु चाचण्या :
- आण्विक चाचण्या करणाऱ्या देशांमध्ये भारत, अमेरिका, रशिया, फ्रान्स, यूके, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. या देशांनी आजपर्यंत एकूण 2,056 अण्वस्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्यात.
- पहिला आण्विक स्फोट 1945 मध्ये झाला. उत्तर कोरिया हा 2017 मध्ये आण्विक चाचणी घेणारा शेवटचा देश होता.
- सध्या अण्वस्त्रे असलेले नऊ देश आहेत. रशिया आणि युनायटेड स्टेट्सकडे सर्वाधिक शस्त्रे आहेत.
- रशियाकडं 5,997 सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. त्यानंतर युनायटेड स्टेट्सकडे 5,428 अण्वस्त्र आहेत.
अणुचाचण्यांशी संबंधित अपघात :
- चर्नोबिल आणि फुकुशिमा सारख्या शहरांमध्ये आण्विक अपघातांचे गंभीर परिणाम झाले आहेत. या अपघातानंतर अनेक भयंकर आजार, दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि रहिवाशांचे स्थलांतर झाले आहे.
- फुकुशिमा डायची अणुऊर्जा प्रकल्पातून प्रक्रिया केलेले किरणोत्सर्गी पाणी सोडल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत.
- हिरोशिमा आणि नागासाकी बॉम्बस्फोटांमधून वाचलेल्यांना दीर्घकाळ जाणवणाऱ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- आण्विक चाचण्यांविरूद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस अण्वस्त्रमुक्त जगासाठी आणि आण्विक चाचणीचे विनाशकारी परिणाम रोखण्यासाठी पाळला जातो.
हेही वाचा :
- Chandrayaan 3 : चंद्रयान-3 लँडिंगसाठी अंतराळवीर सुनीता विल्यम्सही उत्सुक...
- Google Doodle on Chandrayaan 3 : गुगल बनले भारताच्या यशाचे चाहते; चंद्रयान ३चे यश केले अशा प्रकारे साजरे...
- चंद्रयान 3 देशाचा गौरव, सोनिया गांधींचे इस्रो प्रमुखांना अभिनंदन पत्र